सोलापूर – माणुसकी फाऊंडेशन, सोलापूर आयोजित माणुसकीची ऊब उपक्रमामध्ये यंदाच्यावर्षी ५२३ गरजुंना रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत प्रत्यक्ष मायेचे पांघरूण घालण्यात आले. संस्थेचे यंदाचे जे ८ वे वर्ष आहे. या नवोपक्रमाचे उद्घाटन अमोल शिंदे यांच्याहस्ते तर डॉ.जयासुधा कोटा पाटील, ॲड. रेवणसिद्ध पाटील, जान्हवी माखिजा यांची प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, रेल्वे स्टेशन, सातरस्ता, मसिहा चौक, विजापूर रोड, भारती विद्यापीठ, डीमार्ट चौक, आसरा चौक, विकास नगर चौक, गुरूनानक चौक, कुमठा नाका, सत्तरफुट रोड, कर्निक नगर रोड, अक्कलकोट रोड, जुना विडी घरकूल, हैदराबाद रोड, मार्केट यार्ड, बोरामणी नाका, जोशी गल्ली, जोड बसवण्णा चौक, सिव्हिल चौक, सिव्हिल हॉस्पिटल, रंगभवन, सिद्धरामेश्वर मंदीर परीसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या परिसरात गरजूंना हे ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
यावेळी अनिकेत चनशेट्टी, संदीप लिगाडे, संजीव म्हमाणे, अनिरुद्ध कदम, पृथ्वीराज बिराजदार, आकाश बिराजदार, भुषण पाटील, रेवणसिद्ध थिसके, सुरज नांदर्गी, सोमनाथ सरसंबे, शाम जाधव, निखिल अंकुशे, समर्थ उबाळे, गुरुनाथ केरुर, करण कलबुर्गी, सिद्धांत हिरजकर, लक्ष्मण फलमारी, अभिषेक चिक्कळी आदींनी परिश्रम घेतले.


























