Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सामर्थ्यशाली राष्ट्र उभारणीसाठी समर्थांचे विचार आवश्यक – मोहनबुवा रामदासी

तरुण भारतbyतरुण भारत
December 17, 2025
in solapur
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – भारताच्या महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे असून यासाठी समर्थ विचार हा राष्ट्र उभारणीत मोठे योगदान देणारा आहे असे प्रतिपादन समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी यांनी केले.ते धाराशिव इथे ब्राह्मण कल्याण ट्रस्ट द्वारा आयोजित “श्री ब्रह्मभूषण सन्मान धाराशिव” पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक रणनवरे , ब्राह्मण कल्याण ट्रस्टचे अध्यक्ष एडवोकेट अभय पाथरूडकर, विपिन गंधोरकर, मुकुंद भातंबरेकर ,संतोष बडवे,महेश पाठक यांची उपस्थिती होती.
   यावेळी बोलताना मोहन बुवा रामदासी पुढे म्हणाले की समाजाची दुर्बलता, निष्क्रियता दूर होण्यासाठी समर्थांचा विचार आचरणात आणण्याची गरज आहे.ब्राह्मण समाजाने  गायत्री मंत्राची दीक्षा तसेच वेद उपनिषदांत सांगितलेले आचरण आणि नित्य कर्म करण्याची गरज असून ब्राह्मणांसाठी समर्थ रामदासांनी स्वावलंबनाचे धडे दिलेले आहेत असे सांगितले.समाजातल्या त्रुटी दूर करण्यासाठी समाज संघटन करण्यासाठी समर्थांनी घालून दिलेल्या मार्गावरून चालत राहण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.ब्राह्मण कल्याण ट्रस्ट द्वारा विविध सामाजिक कार्य आणि उपक्रम यामधून श्री समर्थांचेच कार्य सुरू असल्याचे सांगून या कार्यातून सामाजिक बांधिलकी ठेवत समाज सशक्त करण्यासाठी सर्वांनी यात सहभागी होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
     तर श्री दीपक रणवरे यांनी ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना व्हावी या उद्देशाने पुढाकार घेऊन आपण शारीरिक कष्ट आणि त्रास सहन करून केवळ ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी उपोषण केल्याचे सांगितले. ब्राह्मण समाजासाठी आज सामाजिक काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हे कार्य ब्राह्मण कल्याण ट्रस्ट कडून होत असल्याबद्दल त्यांनी कौतुक देखील केले.ब्राह्मण समाजातील तरुण तरुणींनी केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायावर लक्ष केंद्रित करावे, नोकरी करणारे नाही,तर नोकरी देणारे व्हावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
    या कार्यक्रमात धाराशिव शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ ब्राह्मण नागरिकांचा “श्रीब्रह्मभूषण सन्मान धाराशिव”पुरस्कार देऊन सत्कार देखील करण्यात आला.यात धाराशिवच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्ष डॉक्टर उर्मिलाताई गजेंद्रगडकर, धाराशिव शहरात मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर राघवेंद्र डंबळ ,धाराशिव शहरात साहित्याच्या माध्यमातून अनेक कविता कथासंग्रह तसेच साहित्य निर्मिती आणि साहित्य चळवळीला प्रोत्साहन देणारे जेष्ठ कवी राजेंद्र अत्रे,  नवनवीन उद्योग व्यवसायांच्या माध्यमातून धाराशिवकरांच्या सेवेत असणारे श्री रंगनाथराव कुलकर्णी,आणि समर्थ नगर भागातील श्रीराम मंदिराचे माजी विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते भारतराव मसलेकर यांना यावेळी श्री ब्रह्मभूषण सन्मान धाराशिव पुरस्कार श्री मोहन बुवा रामदासी यांच्या हस्ते त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल, बुके अशा स्वरूपात देण्यात आले.
        कार्यक्रमाची सुरुवात  भगवान परशुराम यांच्या प्रतिमा पुजनाने आणि दीपप्रज्वलानाने करण्यात आली.ब्राह्मण कल्याण ट्रस्टच्या कार्याची माहिती अ‍ॅड. अभय पाथ्रूडकर यांनी प्रास्ताविकात देऊन  ट्रस्टच्या वतीने प्रथमच हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून यापुढे संघटनेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त हा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. श्री विपीन गंधोरकर यांनी संघटनेचे विविध उपक्रम तर संतोष बडवे यांनी संघटनेच्या व्हिजन २०३५ बद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ‍ॅड. लक्ष्मीकांत कुलकर्णी, डॉ. स्वप्नगंधा कुलकर्णी,अपर्णा पाठक यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ. गजानन कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमासाठी धाराशिव शहर व परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 331
Previous Post

नवी दिल्लीतील राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातून सोलापूरचे सुजित हावळे विशेष सन्मानित

Next Post

माणुसकीची ऊब उपक्रमाअंतर्गत गरजूंना चादर वाटप 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माणुसकीची ऊब उपक्रमाअंतर्गत गरजूंना चादर वाटप 

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243885

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!