मंगळवेढा – थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील क्रीडा युवक सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने शिवजयंती निमित्त दामाजी एक्सप्रेस कार्यालय येथे सरबत वाटप करण्यात आला.
थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील क्रीडा युवक सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेली २५ वर्षांपासून अनेक सामाजिक उपक्रम संस्थापक अध्यक्ष गोपाळ भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे यांनी राबविले असून नेहमीच एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.यंदाही शिवजयंती निम्मिताने सरबत वाटप चा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी बांधव उपस्थित होते.
यावेळी प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस व थोर मराठा कै अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत सरबत वाटप कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक आरती कनेरे , संस्थापक अध्यक्ष गोपाळ भगरे, मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, राजेंद्र कुमार जाधव, बसवेश्वर घाडगे,भारत ढोणे, अरविंद माने,गोरख पोळ, मच्छिंद्र पोळ, बाळकृष्ण कोंडूभैरी, महेश वठारे, शिवाजी कोंडूभैरी , विक्रम नागणे,अशोक घाडगे,तायाप्पा कोंडूभैरी, समाधान नागणे,सागर कोंडूभैरी, दत्तात्रय जाधव, दत्तात्रय आवताडे, रघुवीर पोळ, स्वप्नील भगरे, मयुर ताड, सुधीर भगरे, आनंद माने,शिक्षक नेते सिद्धेश्वर भगरे, विठ्ठल ताटे,पो हवालदार बसवराज कोष्टी, निवृत्ती कदम आदी मान्यवर उपस्थित होते…



























