वेळापूर – वेळापूर येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने सभासदांना दहा टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोसायटीचे ज्येष्ठ सभासद पांडुरंग माने देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख म्हणाले की ही संस्था शंभर वर्षांपासून शेतकऱ्यां च्या विकासासाठी कार्यरत आहे, या संस्थेकडे १३५० सभासद असून या संस्थेची वार्षिक उलाढाल दहा कोटीच्या पुढे आहे. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना सर्व शेतीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, सतीशबप्पा माने देशमुख, दत्तात्रय माने देशमुख, पांडुरंग पनासे, विजय चव्हाण, श्रीधर देशपांडे, मार्केट कमिटीचे संचालक बाळासाहेब माने देशमुख, आप्पा अडसूळ, अर्जुन भाकरे, नामदेव जगदाळे, दत्तात्रय चंदनशिव संस्थेचे सचिव दीपक माळवदकर , शिवाजी आडत, संजय करमाळकर यांच्यासह सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.