माढा : जिल्हा परिषद मुलींची शाळा येथील पुर्वीच्या शाळा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपला असल्याने नव्याने समिती गठीत केली आहे.त्या समितीच्या अध्यक्षपदी गणेश मोरे व उपाध्यक्षापदी वर्षा गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी यासंदर्भात शाळेमध्ये पालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सदस्य पदाचे सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून माढा तरूण भारत प्रतिनिधी शेखर म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन शाळा व्यवस्थापन समिती निवडी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व पालकांमधून नियुक्त करण्यात आली. या समितीमध्ये ७५ टक्के सदस्य पालकांमधून नियुक्त करण्यात आले व २५ टक्के सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्था शिक्षक प्रतिनिधी शिक्षणप्रेमी व विद्यार्थी प्रतिनिधी यातून नियुक्त करण्यात आले आहेत. पहिली ते सातवीच्या पालकांमधून ११ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी समितीचे तत्कालीन अध्यक्ष नितीन (नाना) साठे उपाध्यक्ष देवीदास खरात, नगरसेवक नाना साठे मुख्याध्यापक सुरेश माळी सहशिक्षक विनोद परिचारक चारुदत्त अष्टेकर सोमनाथ शिंदे प्रवीण भांगे तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
समितीचे नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.
अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल गणेश मोरे यांनी पालक व शिक्षकांचे आभार मानले व शाळेतील जे काही अडीअडचणी असतील त्याचबरोबर भौतिक सुविधे संदर्भातील गोष्टी वर आम्ही काम करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
मुख्याध्यापक सुरेश माळी व्यक्त होताना म्हणाले यापूर्वी च्या व्यवस्थापन समितीने शाळेसाठी अतिशय उत्तम काम केले आहे. त्याच पद्धतीने नवीन गठीत झालेली समिती देखील काम करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.






















