दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईच्या काळात काटकसर आणि पैशांची बचत करणे महत्त्वाचे आहे. नोकरदार लोकांच्या खात्यात महिन्याच्या सुरुवातीला जसा पैसा येतो, तशा त्याला वाटा फुटतात आणि मग बचत होत नाही. परंतु तुम्ही तुमच्या पगारा एवढीच आणखी इन्कम (साइड इन्कम) हवी असेल तर तुम्ही ते सहज करु शकता. यासाठी एक फॉर्म्युला आहे ज्याच्या मदतीने तुमचा पगार जेवढा आहे
जवळपास प्रत्येक नोकरदार व्यक्तीची एकच तक्रार असते ते म्हणजे त्यांच्या हातातील पैसा वाचत नाही कारण त्यांचा पगार कमी आणि खर्च जास्त आहेत. तसेच भविष्याबाबतही ते योग्य नियोजन करत नाहीत. परंतु पगारदार व्यक्तीला सांगितले की जितका त्यांचा पगार आहे त्यातूनच ते अतिरिक्त कमाई म्हणजे साइड इन्कम कमावू शकतात, मग? किंवा असे म्हटले तर तुम्हाला तुमच्या पगारालाही हात लावायची गरज पडणार नाही, कारण इतर मार्गांनी तुम्ही पगारापेक्षा जास्त कमाई करू शकाल. यामागे एक विशेष सूत्र आहे. जर तुम्ही खासगी नोकरी करत असाल तर तुम्हाला साइड इन्कमचा सिक्रेट फॉर्म्युला माहित असायला हवा.
५० हजार रुपये पगार असलेल्या लोकांसाठी फॉर्म्युला
तुम्ही तुमच्या पगाराइतके वेगळे उत्पन्न मिळवू शकता. यासाठी एक विशेष सूत्र आहे जे इथे आपण समजून घेऊया. जर तुमचा मासिक पगार ५० हजार रुपये आहे आणि तुम्हाला दरमहा ५० हजार रुपये वेगळे उत्पन्न हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला दरमहा तुमच्या पगारातील किमान ३०% बचत करावी लागेल. म्हणजे दरमहिना पन्नास हजार रुपये वेतन असलेल्या व्यक्तीला पगारातील किमान ३०% रक्कम बचत करावी लागेल, ज्याला तुम्ही म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणु शकता.
म्युच्युअल फंडात चांगला परतावा मिळण्याची शक्यता असून SIP च्या गणितानुसार जर एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला १५,००० रुपयांची SIP केली तर त्याला १० वर्षांत १५ टक्के दराने सुमारे ४१,७९,८५९ रुपये परतावा मिळेल.
याशिवाय आणखी सोप्या शब्दात समजून घ्यायचे तर तुम्ही दर महिन्याला SIP मध्ये १५,००० रुपयांची गुंतवणूक केली तर पाच वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे १३.५ रुपये लाख होईल. तसेच पुढील तीन वर्षांसाठी गुंतवणूकदाराने याच पद्धतीने आणखी पैसे जमा केल्यास आठ वर्षांनी जमा केलेले भांडवल सुमारे २८ लाख रुपये आणि १० वर्षात ही रक्कम ४१,७९,८५९ रुपये होईल.
पगार वाढल्यास गुंतवणूकही वाढवा…
लक्षात घ्या की वरील अंदाज फक्त सुरुवातीच्या पगारानुसार बांधण्यात आले असून बहुतेकांचा पगार ७ ते ८ वर्षात दुप्पट होतो. अशाप्रकारे पगारात वार्षिक १०% वाढ झाल्यास दरमहा ५० हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचा पगार आठ वर्षांत एक लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. त्यामुले गुंतवणूकदाराने वाढत्या पगारासह गुंतवणुकीची रक्कम वाढवली तर १० व्या वर्षात गुंतवणूकदार पगारातून दरमहा ३५,३६९ रुपये बचत कार्याला सुरू करेल.
म्हणजे जर ५० हजार रुपये पगारदार व्यक्तीने दरमहिना १५,००० रुपयांनी SIP केली आणि त्यात दरवर्षी १०% वाढ केली, तर १०व्या वर्षी एकूण SIP ३५ हजार रुपये होईल. यानुसार १० वर्षात १५% वार्षिक परताव्यावर एकूण रक्कम ५९,३६,१२९ रुपये होईल आणि गुंतवणूक १५ वर्षे सुरु ठेवल्यास तुमची एकूण १,६,४९,९९२ रुपयांची कमाई कराल.
उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ आवश्यक
मात्र, दरमहा पगारातील ३०% बचत करून गुंतवणूक करणे थोडे कठीण आहे. परंतु तुम्ही उत्पन्न आणि खर्चामध्ये समतोल साधला तर कोणतीही अडचण येणार नाही. सुरुवातीला पगारातील ३०% बचत करायची असेल तर सर्वप्रथम अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.