महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे हा दिवस मराठीपणाचा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यामुळे हा दिवस मराठीपणाचा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो.
असा आहे महाराष्ट्र दिनाचा इतिहास :
अन् महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती झाली :
१५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र नव्हते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्यामुळे भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरु लागली. गुजराती भाषिकांनी स्वत:चे वेगळे राज्य हवे होते. तर, मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून १९६० मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.
१०६ हुतात्म्यांच्या आंदोलनाची गोष्ट :
स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड मराठमोळ्यांच्या मनात धुमसत होती. त्यामुळे २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांनी तत्कालीन सरकारचा निषेध करत कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी, आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मात्र, जमाव त्यालाही जुमला नाही. अखेर मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात १०६ आंदोलकांना हौतात्म्य आलं.