मोडनिंब – सोलंकरवाडी (ता. माढा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कै. सुरेशबापू पाटील यांच्या स्मरणार्थ तालुकाध्यक्ष योगेश पाटील यांनी शाळेचे मुख्याध्यापक रामकृष्ण केदार व तत्कालीन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वामन यादव यांच्याकडे २५ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी बोलताना सरपंच योगेश पाटील यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जन सुविधा योजनेतून सोलंकरवाडी-पडसाळी रस्त्यासाठी ८ लाख रुपये व पडसाळी ते सोलंकरवाडी शिव रस्त्यासाठी ९ लाख रुपये मंजूर करून घेऊन सोलंकरवाडी गावच्या विकासात भर टाकली असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. अनिल गोळवलकर, डॉ. प्रशांत कोल्हे, डॉ. संतोष दळवी, रोटरीचे अध्यक्ष निलेश गिड्डे, औदुंबर पाटील, ज्योतीताई कुलकर्णी, निलेश पाटील, राजा भांगिरे, अतुल माळी, माजी सरपंच अनंता गलांडे, संदीप गलांडे, अर्जुन भांगिरे, बाळासाहेब माळी, गोपाळ माळी, आजिनाथ शेंडगे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शहाजी यादव यांनी केले.

















