सोलापूर – साखर पेठ येथील बाहुसार शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हिंगुलांबिका प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी दुहेरी यश प्राप्त केले आहे. राजीव गांधी इनडोर स्टेडियम येथे जपान कराटे डू शूडोकॉन महाराष्ट्र राज्य व सोलापूर यांच्या वतीने INS महाराष्ट्र स्टेट कराटे चॅम्पियन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळेची इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा वीरेंद्र वेदपाठक हिने गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. त्याचबरोबर 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त निहाल काशिनाथ किरनळळी यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता चौथीची कुमारी अनन्या अंबादास अंकम या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकाविले आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बापू ढगे व सचिव श्री विजय पुकाळे यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री गोपी नवले व प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री प्रमोद हंचाटे उपस्थित होते.























