सोलापूर – डॉ.उम्मे यशफिन सलीम शिले़दार यांनी फिजिओथेरपी ही वैद्यकीय पदवी उत्कृष्ट गुणांसह यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. त्यांनी आपले शिक्षण श्री सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सोलापूर येथून पूर्ण केले असून हे महाविद्यालय महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, नाशिक अंतर्गत कार्यरत आहे.
आपल्या यशाबाबत बोलताना डॉ. उम्मे यशफिन म्हणाल्या की, “हे यश केवळ माझे नसून आई-वडिलांचे आशीर्वाद, भावाचा पाठिंबा आणि मोठी बहिणी डॉ.हुजेफा शिबीन यांच्याकडून मिळालेली प्रेरणा यामुळेच मला हे यश मिळाले. तसेच शिक्षकांचे मार्गदर्शनही खूप मोलाचे ठरले.”
त्या पुढे म्हणाल्या की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक यश आणि मी केलेली मेहनत मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करते.”
या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते, हे डॉ. उम्मे यशफिन शिले़दार यांनी दाखवून दिले आहे.

























