तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील ज्येष्ठ व अनुभवी डॉ. ओमकार संगवई यांचे नातू व साधना मेडिकलचे संचालक वीरेंद्र संगवई यांचे चिरंजीव डॉ. संजय वीरेंद्र संगवई यांनी एमबीबीएस चांगल्या गुणवत्तेने पुर्ण केल्यानंतर त्यांची MD Paediatric साठी रामा मेडिकल कॉलेज दिल्ली येथे निवड झाली.
डॉ. संजय ने तळणी सारखा डोंगराळ भागातील जिल्हापरिषद मधुन शिक्षणाचे धडे गिरवत एमबीबीएस नंतर रामा मेडीकल कॉलेज दिल्ली येथे MD Paediatric साठी निवड पर्यंतचा प्रवास कौतुकास्पद आहे. त्यांचा या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.