बार्शी – गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये कौशल्य विकास मंत्रालायकडून शासकीय आयटीआय (ITI) कॉलेजच्या मॅनॅजमेंट कौन्सिलवरती निवड व २०२६ मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठा, सोलापूरच्या कॉस्मेटिक टेकनॉलॉजि अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली.
डॉ. सागर कांबळे हे आखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे (ABVP) सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत. त्या काळात त्यांनी विध्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन, मोर्चे काढलेले आहेत. त्यानी बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यांना कॉलेज जीवनापासून त्यांना शैक्षणिक व सामाजिक कामाची आवड आहे.
त्यांनी D. Pharmacy सोजर कॉलेज, बार्शीमधून तर B.Pharmacy, M.Pharmacy हे के.टी. पाटील कॉलेज, धाराशिवमधून केली असून त्यांच स्पेसिऍलिसशन Pharmaceutics या विषयातून झाले असून त्यांच्या नावे नॅशनल जरनल मध्ये अनेक शोध पेपर (Research paper) पब्लिश आहेत. त्यांनी अनेक कॉन्फरन्सदेखील अटेंड केल्या आहेत व तसेच शैक्षणिक दर्जा वाढवण्याकरिता काही कॉन्फरन्स स्वतः आयोजित केल्या आहेत.
गेल्या वर्षी त्यांनी डॉ. तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोनेरे येथून फार्मसी विषयातील पहिली PhD डिग्री प्राप्त केली आहे. त्यांच्या नावे तंत्रशास्त्र विद्यापीठात तसे रेकॉर्ड देखील आहे. सदर निवडीबद्दल त्यांचे शैक्षणिक स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी पुढे युवकांच्या शैक्षणिक प्रश्नाकरीता व शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.


























