पिलीव – माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील इरकरवस्ती कडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड बिकट अवस्था अक्षरश जिव मुठीत धरून या रस्त्यावरुन इरकरवस्ती करांना ये _ जा करावी लागत होती .पंचवीस वर्षापुर्वी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व गणपतराव देशमुख यांनी या रस्त्याला थोडाफार निधी दिला होता .
यानंतर इरकरवस्ती करांनी आपली कैफियत माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडे मांडली असता त्यांनी 30/54 या योजनेतुन रस्त्याचे खडीकरण करण्यासाठी विस लाख रुपयांचा निधी ह्या रस्त्यासाठी दिला त्याचे भूमीपूजन त्याच्याच उपस्थित करण्यात आले .यावेळी माळशिरस तालुका मंडल अध्यक्ष नितीन मोहीते ,माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, शिवराज पुकळे ,मळोलीचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, प्रमोद भैस याच्या उपस्थितत करण्यात आले .
यावेळी सुळेवाडीचे माजी सरपंच नाथा सोलंकर, माजी सरपंच शरद इरकर, बापुराव सुळे, शंकरशेठ सुळे ,श्रीकांत दडस,जयसिंग सुळे ,वस्ताद सोलंकर, बाबुराव सुळे,युवा नेते विक्रम सुळे,हमीद इरकर साहेब, विजय सुळे, राहुल इरकर, दुर्योधन बिडे, राहुल इरकर, तात्यासाहेब बरकडे, उमाजी बोडरे, शिंगु सुळे, बाळु पडळकर, बापुराव सुळे, हरी सुळे, गुंडा माने ,योगेश जानकर, रामचंद्र सुळे, लक्ष्मण माने, जाबर माने, काशिलीग दोलताडे, विशाल सुळे, अजय खताळ, विठ्ठल माने, पोपट माने, दत्तात्रय सुळे, अक्षय सुळे, महादेव इरकर, विजय शिंदे, रघुनाथ इरकर, गणेश हुबाले, हणमंत इरकर, खंडू फुले, वसंत इरकर, पोपट बगाडे, देविदास बिडे, वसंत शेजाळ, विकास बगाडे, सुनिल इरकर, शहाजी इरकर, संजय इरकर, पोपट बंडगर, छगन इरकर, भारत इरकर, वामन इरकर, अंकुश इरकर, जालिंदर बगाडे यांच्यासह इरकरवस्ती येथील ग्रामस्थ यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी युवा नेते विक्रम सुळे यांनी इरकरवस्ती येथील रस्त्याचा पंचवीस वर्षानंतर मार्गी लावला याबद्दल त्यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचे इरकरवस्ती ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
सुळेवाडी इरकरवस्ती येथील रस्त्याचे भूमीपूजन करताना माजी आमदार रामभाऊ सातपुते व इतर मान्यवर.


















