भंडारा, २७ जून, (हिं.स) – शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायाला दोन लाख ट्रॉन्सफार्मरचे भरून २४ तास विज पुरवठा संलग्न केला असतांना सुद्धा सोनपूरी येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील विद्यृत पुरवठा सतत सहा तास खंडीत राहील्याने तब्बल 500 च्या वर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तक्रारदार शेतकऱ्याने या महावितरणच्या दिरंगाईमुळे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आणि हे नुकसान भरपाई भरून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा ग्राहक मंच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
सोनपूरी येथील शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी बॅंक ऑफ इंडिया मधून १२ लाखांचे कर्ज घेऊन गावीच शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला.अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडित झाला. कठाणे यांनी एकोडी महावितरणला फोन केला की येथे २४ तास वीज पुरवठा संलग्न केला आहे व उष्णतेने पक्ष्यांची दयनीय अवस्था होवून मृत्यू होत आहेत. लाईट गेल्यानंतर येथे त्यांचे ओजल पोल्ट्री फार्मवर कर्मचाऱ्यांनी उष्णतेमुळे पक्षी वाचविण्यासाठी त्यांना थंड पाण्यात टाकून काढणे ही क्रिया करून कोंबड्या वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पण ते प्रयत्न विफल ठरले.
यावर या शेतकऱ्याच्या फोनवर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत वीज सुरू होणार नाही असे शेतकऱ्यास फोनवर सांगितले.यात ६ तासांपेक्षा जास्त अवधी गेल्याने बुधवारला ४७२ कोंबड्या आणि गुरूवार २७ ला पहाटे ५७ कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला.शेतकरी व कुक्कुटपालन व्यवसायिक गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणला दोन लाख रूपये भरून ट्रॉन्सफार्मर बसविला जेणेकरून या कुक्कुटपालन व्यवसायाला २४ तास वीज अबाधित राहील.पण महावितरणच्या दिरंगाईमुळे पाचशेच्या वर कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाला.यात शेतकऱ्याचे एकुण दिड लाख रुपयांचे नुकसान झाले सदर नुकसान भरपाईची मागणी शेतकरी गिरीश प्रकाश कठाणे यांनी महावितरणकडे केली आहे.