उमरी – उमरी येथील मॉर्डन इंग्लिश स्कूल या शाळेने मुलांची सहल विमानाने सिंधुदुर्ग येथे आयोजित केली होती .सदरील सहलीचा दुसरा टप्पा सिंधुदुर्गला विमानाने रवाना झाला. विमानाने मुलांना शाळेची सहलीच नेणारी ही पहिली शाळा असल्यामुळे सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. मुलांनी सिंधुदुर्ग येथे ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली . बोट सफर केली.तिथला समुद्रकिनारा आणि सौंदर्य त्यांनी अनुभवले पण त्यासोबत पर्यावरणाचे संवर्धन करण्याविषयी आपली जाणीव व्यक्त केली.
सुंदर अशा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक येऊन प्लास्टिकच्या बाटल्या, मेनकापड इत्यादी गोष्टी टाकतात त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो तसेच तिथले सौंदर्य नष्ट होते .शाळेमध्ये शिकवलेल्या या परिपाठानुसार पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मुलांनी शैक्षणिक सहलीचा आनंद तर घेतलाच पण समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि कचरा गोळा करून बाजूला केल्य
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये ही सामाजिक जाणीव व पर्यावरणाविषयीचे प्रेम आपुलकी रुजली जावी अशी अपेक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनुराधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली मुलानी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे . मुलांनी अनुभवलेली ही सहल अतिशय नाविन्यपूर्ण. ऐतिहासिक व सामाजिक जाणीव जपणारी आणि आनंददायी झाली अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.























