हदगाव / नांदेड – विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी हदगावच्या रिक्त असलेल्या जागी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा. नागेश पा. आष्टीकर यांचे कट्टर समर्थक शशिकांत शिवराज माळोदे यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीवर हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खा. नागेश पा. आष्टीकर यांचे वर्चस्व आहे. काही महिन्यापूर्वी संचालकाच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली होती त्या ठिकाणी खा.नागेश पा. आष्टीकर व मराठवाडा युवासेना सचिव कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपला कट्टर समर्थक असलेल्या शशिकांत माळोदे यांचे नाव समोर केले. एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक एस. जी. गन्लेवार यांनी शशिकांत शिवराज माळोदे यांची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालकपदी
बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी चेअरमन ज्ञानेश्वर जाधव, व्हाईस चेअरमन पंडितराव घुन्नर, संचालक जीवनराव देशमुख,प्रकाशराव देशमुख, राजेश्वर तालंगकर, भाऊसाहेब तालंगकर,शफी पटेल,श्रीमती सुमित्राबाई गोदजे, सौ दुर्गा कोल्हे, धम्मपाल वाठोरे, रामचंद्र लकडे आदी उपस्थितीत होते. संस्थेचे सचिव संजय तवर, कर्मचारी बी.शी.शाहा व संजय लहानकर यांनी सभा यशस्वी केली.
























