Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – कॉ.गंगाधर गायकवाड

तरुण भारतbyतरुण भारत
November 22, 2025
in marathwada
0
0
SHARES
61
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


माहूर / नांदेड – माहूर तालुक्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पाचोंदा येथील दुहेरी हत्याकांड (डबल मर्डर) प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात आली असून, पीडित दलित कुटुंबियांना ३० दिवसाच्या आत शासनाने यथोचित मदत जाहीर करावी, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी सीटू, नांदेड जिल्हा कमिटी तथा मुळचे माहूर तालुक्यातील वझरा शेख फरीद येथील रहिवासी असलेले कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

२० नोव्हेंबर २०२५ रोजी माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दोन सख्या जावा असलेल्या दलित कुटुंबातील महिलांची क्रूरपने गळा दाबून खून झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व सपोनि रवी वाहुळे यांच्या पथकाने अवघ्या काही तासांतच दोन आरोपीना अटक केली असून, आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे. जलदगती प्रभावाने कार्यवाही केल्यामुळे पोलीस विभागाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

ज्याप्रमाणे या पाचोंदा दुहेरी हत्याकांड (डबल मर्डर) प्रकरण स्थागुशा, नांदेडच्या पथकाने यशस्वीपणे हाताळत अवघ्या १२ तासांच्या आत जलदगतीने शोधकार्य राबवत हत्याकांडातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे, त्याचप्रमाणे सदरील प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येत असून पीडित दलित कुटुंबियांना ३० दिवसाच्या आत शासनाने यथोचित मदत करावी यासाठी कॉ.गंगाधर गायकवाड प्रयत्न सुरु केले आहेत.
पाचोंदा येथील अंतकलाबाई अशोक अडागळे आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे या दोघी जावा शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अरोपी दत्ता सुरेश लींगलवार रा.सदोबा सावळी ता. आर्णी जि.यवतमाळ व गजानन गंगाराम येरजवार रा.गंगाजी नगर ता.माहूर जि.नांदेड या दोघांनी खून केला आहे.

या अतिशय गंभीर घटनेविषयी सीटू कामगार संघटनेने दुःख व्यक्त केले आहे. सदरील दलित महिला अत्याचार प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोगाने अद्याप घेतली नसल्याचे कॉ. गायकवाड यांनी सांगितले असून, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार मदत निधी केंद्र/राज्य शासनाकडून ५ लाख रुपये,मुख्यमंत्री सहायता निधी २ ते ५ लाख रुपये, प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता २ लाख रुपये,महिला मृत्यू अनुदान, महिला व बाल विकास विभागाकडून १ लाख रुपये अशी मदत मिळते.

परंतु, शासनाकडून कायदेशीर मदत स्वयंस्फूर्तीने पिडीत परिवाराला मिळणे अपेक्षित असताना प्रशासकीय यंत्रणा अजून हालचाल करतांना दिसत नसल्यामुळे सीटू च्या वतीने प्रयत्न सुरु केले असून यदाकदाचित शासनाने दुर्लक्ष केले तर सीटू संघटना पूर्ण ताकतीने पीडित कुटुंबियांना मदत करेल, गरज पडल्यास जनहित याचिका दाखल करणार असे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

Post Views: 339
Previous Post

शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी जपली पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीव

Next Post

हदगाव नगराध्यक्ष पदासाठी १० आणि सदस्य पदासाठी ९६ उमेदवार रिंगणात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हदगाव नगराध्यक्ष पदासाठी १० आणि सदस्य पदासाठी ९६ उमेदवार रिंगणात

ताज्या बातम्या

ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यां बाबत निर्णय घेण्यात यावा – सदाशिव बेडगे

February 16, 2026

लव जिहादच्या विरोधात महिलांनी एकत्रित येत दिली शासन निर्णयाची फोटो फ्रेम

February 16, 2026

युवक मंडळ यांच्यावतीने कक्कय्या जयंती साजरी

February 16, 2026

भैरूरतन दमाणी अंधशाळेकडून कु. गंगा कदम हिचा गौरव

February 16, 2026

जखमी अवस्थेत आढळला कुदळ्या पक्षी

February 16, 2026

स्व.प्रा. डॉ. चंद्रकांत भानुमते स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रा.डॉ. बी.एच. कुलकर्णी यांना जाहीर

February 16, 2026

राज्यस्तरीय आय एम ए रनेथॉन लातूर स्पर्धेत साईश्वर, श्रद्धा व वैशाली गुंटूक प्रथम

February 16, 2026

कै. उमेश शेणॉय स्मृती चषक स्पर्धेत व्यावसायिक महिला व पुरुष गटात थरारक सामने

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682725

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697