तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर जिल्हात राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ अझ्ली असून आमदार तानाजी सावंत यांचे बंधु शिवाजीराव सावंत यांनी पक्ष पदाचा राजीनामा दिला. गेल्या तीन वर्षांपासून शिवाजीराव सावंत हे सोलापूर जिल्हा संपर्क पदावर कार्यरत होते. त्यांनी पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांना आपला राजीनामा सोपवला.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवाजी सावंत यांचा राजीनामा देणं हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या गटाला मोठा धक्का मानला जातोय. अंतर्गत गटबाजीचा फटका थेट शिवसेना शिंदे गटाला बसला आहे अशी चर्चा सुरु आहे.
तसेच, शिवाजी सावंत यांच्या एका कार्यक्रमाला ऐनवेळी एकनाथ शिंदे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यावेळपासूनच शिवाजी सावंत नाराज असल्याचे बोलले जात होते.