सोलापूर – महिला आणि मुलींना सुरक्षितता व कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने, एकता महिला मंचच्या वतीने जामगाव माध्यमिक विद्यालय, जामगाव (आ), तालुका बार्शी येथे आज, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी, सदस्यांसाठी, माता-पालकांसाठी तसेच विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी निर्भया पथकचा मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचा प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हे पूजन झाले. यानंतर, एकता महिला मंचच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.यावेमहिला पोलीस नम्रता गटकुळ यांनी महिला आणि मुलींना कायद्यांविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी निर्भया पथकाबद्दल सविस्तर माहिती दिली आणि अत्यंत आश्वासक शब्दांत सांगितले की, जर कोणीही मुलींना कोणत्याही प्रकारची छेडछाड करत असेल किंवा जाणीवपूर्वक त्रास देत असेल, तर त्याची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.
त्यांनी खात्री दिली की, “निर्भया पथक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”तसेच निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे यांनी आपल्या मार्गदर्शनादरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर महिला व मुलींना माहिती दिली.
त्यांनी आवाहन केले की, महिला आणि मुलींनी कोणत्याही हिंसाचाराला बळी न पडता त्यापूर्वीच त्वरित निर्भया पथकाशी संपर्क साधावा.
त्यांनी आश्वासन दिले की, “निर्भया पथक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.” तसेच, कोणत्याही संकटाच्या संदर्भात विलंब न करता थेट आमच्याशी संपर्क साधावा,तसेच एकता महिला मंचच्या प्रमुख माहेश्वरी गुरव यांनी मुलींना संबोधित करताना सांगितले की,”एकता महिला मंचच्या सक्रिय माध्यमातून आम्ही आजच्या या मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा विचार करता हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच अनुषंगाने, मुलींना जागरूक आणि सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही हा विशेष कार्यक्रम घेत आहोत.”यावेळी
या मार्गदर्शन मेळाव्यास निर्भया पथकाचे प्रमुख बाबासाहेब घाडगे, महिला पोलीस नम्रता गटकुळ, उपमुख्याध्यापक सतीश जाधव, पोलीस पाटील नंदकुमार आवटे,
एकता महिला मंचचे प्रभाकर क्षीरसागर, रमेश भोसले, शिवाजी घेमाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच, यावेळी एकता महिला मंचच्या तालुका कोषाध्यक्षा रेश्मा मुकटे, मंचच्या प्रमुख माहेश्वरी गुरव, सुचिता कुटे, सुनिता नवले, कल्पना वाघमोडे, शामबाला सुतार, पद्मजा आवटे, शुभांगी अडसूळ, सोनाली खुरंगुळे, चैताली सुतार, स्नेहल तळेकर, उषा ठाकूर, कल्पना आवटे, सुवर्णा भुईभर, वैशाली यमगर इत्यादी सदस्या व अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रमेश भोसले यांनी केले, तर उपमुख्याध्यापक सतीश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा मार्गदर्शन मेळावा महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला.



















