अक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामींच्या वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र अक्कलकोटचा व वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय होत असल्याचे मनोगत भाजपचे नेते व आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सहकुटूंब भेट देवून श्री.स्वामी समर्थांचे दर्शन घेतले नंतर बोलत होते. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांनी आमदार प्रवीण दरेकर व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सन्मान केला.
यावेळी आमदार प्रवीण दरेकर बोलताना म्हणाले की, स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांप्रमाणे माझ्या कुटूंबियांसह मलाही श्री.स्वामी समर्थांच्या जागृततेची व त्यांच्या कल्पनाशक्तीची प्रचिती आली आहे. यामुळे जीवन स्वामीमय झाले आहे. माझ्यासह अनेक भाविकांच्या जीवनात स्वामी भक्तीला अग्रस्थान असल्याची सांगितले.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, मा.नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, मोतीराम राठोड, शिवशरण जोजन, प्रदीप पाटील, ननू कोरबू, नावीद डांगे इत्यादी भाजपचे पदाधिकारींसह दर्शन घाटगे, श्रीशैल गवंडी, सचिन हन्नूरे, विपूल जाधव उपस्थित होते.
फोटो ओळ – आमदार प्रवीण दरेकर यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, मिलन कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.


















