मध्य रेल्वेवरील व्हिस्टाडोम डब्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ते अत्यंत लोकप्रिय आहेत. मुंबई-गोवा मार्गावरील दऱ्या, नद्या आणि धबधब्यांची चित्तथरारक दृश्ये असोत किंवा मुंबई-पुणे मार्गावरील पश्चिम घाटाची नयनरम्य दृश्ये असोत, काचेचे टॉप आणि रुंद खिडक्या असलेले हे डबे लोकप्रिय ठरले आहेत. २०२३-२४ या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेतील गाड्यांवर चालणाऱ्या व्हिस्टाडोम डब्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे. १.७६ लाख प्रवाशांनी या डब्यांमधून प्रवासाचा आनंद घेतला असून, रु. २६.५० कोटी प्राप्त केले आहे.
व्यवसायानुसार :
12125/12126 मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस ९९.२६% म्हणजेच ३०,९८१ प्रवाशांसह सर्वात पुढे आहे.
11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस ९७.४९% म्हणजेच ३१,१६२ प्रवासी आहे.
12051/12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये ९५.४९% म्हणजे ३०,७५८ प्रवासीसंख्या आहे.
12123/12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीनची व्याप्ती ९२.७२% म्हणजेच २९,७०२ प्रवासी आहेत.
12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ८७.८४% म्हणजे २४,२७४ प्रवासी आणि
22119/22120 मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस ७७.८५% म्हणजेच २९,५२७ प्रवाशांसह थोडक्यात मागे आहे.
महसूलानुसार :
22119/22120 मुंबई-मडगाव-मुंबई तेजस एक्स्प्रेस रु.७.६८ कोटी उत्पन्नासह सर्वात पुढे आहे.
12051/12052 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जनशताब्दी एक्स्प्रेसचे उत्पन्न रु. ६.१६ कोटी.
12025/12026 पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेसचे उत्पन्न रू ४.९८ कोटी.
12123/12124 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन रू. २.७२ कोटी.
12125/12126 मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसचे उत्पन्न रू. २.६० कोटी आणि
11007/11008 मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस रु. २.३५ कोटी कमाईच्या अगदी मागे आहे.
२०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच पहिल्यांदा मध्य रेल्वे वर सादर करण्यात आले. प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे, मुंबई-मडगाव मार्गावरील दुसरा विस्टाडोम कोच दि.१५.०९.२०२२ पासून तेजस एक्सप्रेसला जोडण्यात आला.
या डब्यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये दि. २६.६.२०२१ पासून हे डबे सुरू करण्यात आले आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दि. १५.८.२०२१ पासून मुंबई-पुणे मार्गावरील आणखी दोन विस्टाडोम डबे डेक्कन क्वीनला जोडण्यात आले. २०२१ आणि प्रगती एक्सप्रेसमध्ये दि. २५.०७.२०२२ पासून तसेच पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये दि. १०.०८.२०२२ पासून एक विस्टाडोम कोच जोडण्यात आला.
व्हिस्टाडोम डब्यांमध्ये काचेच्या छतासोबतच रुंद खिडक्या, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, दिव्यांगांसाठी रुंद सरकते दरवाजे, सिरॅमिक टाइल फ्लोअरिंग असलेली टॉयलेट इत्यादी अनेक वैशिष्ट्ये असून व्ह्यूइंग गॅलरी आहे.