मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक महिलांनी लाभ घ्यावा पुजाताई व्यवहारे
मुदखेड ता प्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा पूजाताई व्यवहारे यांचे आवाहन. महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवील्या जात आहे त्या अनुषंगाने सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा पूजाताई माधव पाटील व्यवहारे यांनी केले.
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेला महिलांच्या सर्व स्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे अत्यंत सोप्या आणि सरळ पद्धतीने महिला सभासदांचे नाव नोंदविले जात असून दलालाकडे न जाता नारीशक्ती या मोबाईल ॲप द्वारे सुद्धा घरी बसल्या रजिस्ट्रेशन करता येणार आहे सोबतच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत सुद्धा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे. त्याबरोबर कुठलाही सेतू सुविधा केंद्रावरून सुद्धा याची नाव नोंदणी करण्यात येत आहे.
त्यामुळे महिलांकडून या योजनेसाठी कुठेही पैसे द्यायची गरज नाही. जर कुणी पैसे घेतल्याचे निर्देशनास आल्यास त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष पूजाताई व्यवहारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे