सुस्ते – श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सन 2006-2007 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल 18 वर्षांनंतर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा देत त्यांनी शाळेच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न म्हणून शाळेला प्रिंटर आणि संगणक सेट भेट दिला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य अविनाश कटकधोंड होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश चव्हाण यांनी केले.आपल्या प्रस्तावनेत चव्हाण सरांनी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांविषयी आठवणी सांगून साउथ कोरियातील स्वतःचे अनुभव सांगितले. विद्यार्थी मनोगतामध्ये असिस्टंट प्रोफेसर राजेंद्र गायकवाड सरांनी स्वतःचे अनुभव सांगितले. याचबरोबर विद्यार्थी संतोष बोबडे यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त केले. प्रशालेचे प्राचार्य कटकधोंड यांनी उद्योजक संतोष बोबडे यांचा विशेष सत्कार केला. तसेच मेजर गणेश चव्हाण यांनी दूरध्वनीवरून माजी विद्यार्थी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांच्या मनोगतामध्ये हरिभाऊ बनसोडे यांनी जीवन खूप सुंदर आहे याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच माजी शिक्षक कदम काव्यवाचन केले. माजी प्राचार्य बी.एस. पवार सरांनी शुभेच्छापर संदेश दिला.बाबासाहेब करपे या माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य कटकधोंड सर म्हणाले की, सामर्थ्य हेच जीवन आहे.अथक परिश्रमांनी यशाच्या वाटा सापडत जातात.त्याचबरोबर प्रशालेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. श्री दत्त विद्या मंदिर सीईटी टेस्ट सिरीज याची माहिती देत असताना सीएटी, नीट, जेईच्या धरतीवर श्री दत्त विद्यामंदिर टेस्ट सिरीज चा उपक्रम चालतो असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श् कुमार वाघमोडे यांनी मानले.सदर माजी विद्यार्थी मेळावा यशस्वी करण्यासाठी नितीन लोखंडे,संतोष बोबडे,डॉ गणेश चव्हाण,धीरज पाटील,मोहसीन तांबोळी,आदम मुलाणी, प्रिती घाडगे, शुभांगी पाटील,ललिता करपे,आणि सर्व माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास आजी,माजी शिक्षक उपस्थित होते.


















