Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात भाजपामध्ये जोरदार इनकमिंग! माजी आमदार राजन पाटील, यशवंत मानेसह रणजितसिंह शिंदेनी हाती घेतले कमळ

तरुण भारतbyतरुण भारत
October 30, 2025
in mumbai
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  

मुंबई: गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत राहिलेल्या सोलापुर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या भाजपा प्रवेशाबाबतचा बुधवारी सस्पेन्स संपला.

 मोहोळ तालुक्यातील अजित पवार राष्ट्रवादीचे माजी आमदार व सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर, माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह  भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. 

सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारी, नेत्यांनी तसेच मराठवाड्यातील शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. 

 आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यावेळी ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालक मंत्री जयकुमार गोरे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, आ.अनुराधा चव्हाण, आ.सचिन कल्याणशेट्टी, भाजपा सोलापूर पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माजी आ. राम सातपुते, चेतनसिंह केदार सावंत, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. 

यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासासाठी आज या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीयत्वाच्या भावनेने आज सर्वांनी प्रवेश केला आहे 

मंत्री  गोरे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड शक्ती असलेल्या नेत्यांनी परिसराच्या विकासासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. पक्ष ताकदीने सर्वांच्या पाठीशी उभा राहील आणि प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली.  

राजन पाटील म्हणाले की, मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान गहाण ठेवला जाऊ नये यासाठी आम्ही भाजपामध्ये प्रवेश करत आहोत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे नेतृत्व अधिकाधीक सक्षम होण्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करू. रणजीतसिंह शिंदे म्हणाले की, आगामी निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी झोकून देऊन काम करायचे आहे. विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांच्या साथीने काम करू असेही ते म्हणाले. रणजीतसिंह शिंदे यांचे बंधू पंचायत समिती माजी सभापती विक्रम शिंदे, जि.प. माजी सभापती शिवाजी कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकर, रमेश पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजी पाटील, तुकाराम ढवळे, शंभुराजे मोरे आदींनी भाजपामध्ये प्रवेश केला. 

मोहोळ तालुक्यातून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस वि‌द्यार्थी संघटनेचे माजी प्रदेश अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, मोहोळचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, दीपक माळी, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अस्लम चौधरी, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भारत सुतकर, मोहोळ कृ.उ.बा.स. सभापती धनाजी गावडे, कृ.उ.बा.स.चे उपसभापती प्रशांत बचुटे, जि. प. माजी सभापती जालिंदर भाऊ लांडे आदींचा समावेश आहे. 

वडूज चे माजी नगराध्यक्ष गोडसे यांचाही प्रवेश   

खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, पंचायत समितीचे माजी सभापती बळवंतराव माने, माजी सदस्य मोहनराव बुधे, पं. स.माजी उपसभापती हिराचंद पवार आदींचा समावेश आहे. तसेच माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी भाजपा प्रवेश केला. वडूज नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष सुनिल गोडसे, माजी उपनगराध्यक्ष मनोज कुंभार, मार्केट कमिटीचे माजी संचालक काकासाहेब मोटे,तसेच संभाजीनगर येथील निवृत्त शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, निवृत्त उपसंचालक भाऊसाहेब तुपे पाटील, जालन्याचे माजी शिक्षणाधिकारी रमेश पाटील, हिंगोलीचे माजी शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील, नांदेडचे माजी उपशिक्षणाधिकारी व्यंकटेश कोमटवार, शिक्षक क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

——–

दिलीप माने ‘वेटिंग’ वर

 सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप माने यांचाही आज भाजपात प्रवेश होणार होता. मात्र त्यांच्या प्रवेशाला स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असल्याने त्यांना सध्या ‘ होल्ड ‘वर ठेवण्यात आला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून माने यांना पक्षात घेतले जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले 

Post Views: 23
Previous Post

माजी विद्यार्थ्यांनीआठवणींना उजाळा देत शाळेला दिला प्रिंटर आणि संगणक भेट

Next Post

अतिवृष्टी नुकसानभरपाई न मिळाल्यास ; ताळेठोक आंदोलनाचा इशारा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अतिवृष्टी नुकसानभरपाई न मिळाल्यास ; ताळेठोक आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

प्रीतम यावलकर शहर उपायुक्त, तर विजय कबाडे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक #viral #maharashtranews

May 15, 2026

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आशा होत्या घडामोडी #marathinews #solapurnews

May 15, 2026

मा. वृष्टी जैन – सहाय्यक पोलिस अधीक्षक, यांची पोलिस उपआयुक्त, सोलापूर शहरात बदली #solapurnews

May 15, 2026

शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

May 15, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरात ८६ रक्तदात्यांचा सहभाग

May 15, 2026
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम

May 15, 2026
छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

छत्रपती संभाजी जन्मोत्सव सोहळा समिती गरजवंत शाळकरी 25 मुलांना सायकल वाटप

May 15, 2026
पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

पोलिसांसाठी ‘क्रिप्टो’ तपास प्रशिक्षण; कायदा अंमलबजावणी संस्थांसोबतची भागीदारी केली अधिक दृढ

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0865931

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697