सोलापूर : सहा कमान परिसरात ब्रिजच्या खालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी नाल्याचे काम दर्जेदार व नियोजित पद्धतीने पूर्ण करावेत. या कामाचा वेग वाढविण्यात यावा. नागरिकांना पावसाळ्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
महानगरपालिकेच्या वतीने सहा कमान परिसरात सुरू असलेल्या नाल्याच्या कामाची आज महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकुलवार, विभागीय अधिकारी जावेद पानगल तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सहा कमान परिसरात ब्रिजच्या खालून जाणाऱ्या नाल्याचे खोदकाम सुरू असून, या ठिकाणी नाल्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि परिसरातील पाणी निचरा व्यवस्थित व्हावा. यासाठी आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये सोलापूर शहरातील नाला परिसरातील विविध नगरातील घरांमध्ये पाणी शरीराच्या घटना घडल्या होत्या. विविध नगरांना पाण्याचा वेढा लागला होता. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी कामे युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. नाल्याचे प्रवाह सुरळीत करण्याचे कामही वेगात सुरू आहे.