ओडिशा उच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरात चर्चा
भुवनेश्वर, 28 जून (हिं.स.) : बलात्कार आणि हत्येचा दोषी नित्यनेमाने दिवसातून पाच वेळा नमाज पठन करतो म्हणून ओडिशा उच्च न्यायालयाने त्याच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत बदल करून जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. न्या. एस.के. साहू आणि न्या. आर.के. पटनायक यांच्या खंडपीठाने हे शिक्षा परिवर्तन केलेय.
आसिफ अली आणि आबिद अली यांच्यावर 6 वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोप आहे. आसिफ आणि आबिद यांनी पिडीत मुलगी चॉकलेट घेऊन घरी परतत असताना तिला जबरदस्तीने पकडून तिच्यावर बलात्कार केला. गंभीर जखमी झाल्याने बालिकेचा मृत्यू झाला. ट्रायल कोर्टाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर तिसऱ्या आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
यानंतर शिक्षा झालेल्या दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले.आसिफ आणि आबिद यांच्यापैकी आसिफ याची गेल्या 10 वर्षात तुरुंगामध्ये वागणूक चांगली आहे. तसेच दोषी कारागृहात नियमीत 5 वेळा नमाज पठण करून अल्लाचे स्मरण करतो. न्यायालयाने 106 पानी निर्णयात म्हटले आहे की, 10 वर्षांच्या तुरुंगात असिफने तुरुंगातील कर्मचाऱ्यांना त्रास होईल असे कोणतेही काम केले नाही. त्यामुळे त्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. न्यायालयाने दुसरा आरोपी अकील अली याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.