सोलापूर – जुळे सोलापुरातील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये २० डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
आयएमएस ग्रुप आँफ स्कुल्सचे संचालक अमोल जोशी, संचालिका सायली जोशी, डॉ.विपुल दोशी, डॉ.शरणबसव हिरेमठ,डॉ. स्नेहलता हिरेमठ यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त यंदा प्रथमच आयएमआयएसमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. गणिताच्या प्रत्यक्ष उपयोगांचे दर्शन घडवणारे नाविन्यपूर्ण प्रकल्प व प्रतिकृतीं या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. पाहुण्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांची बुध्दीमत्ता आणि कौशल्याचे कौतुक केले.
यावेळी विद्यार्थ्यांना रामानुजन यांच्या गणितातील महान योगदानाची ओळख करून देण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी अधिक रस निर्माण होण्यासाठी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनकार्यावर आधारित एक लघुनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी जागरूकता वाढली, विद्यार्थ्यांना गणितातील सौंदर्य समजले आणि श्रीनिवास रामानुजन यांच्या अमूल्य योगदानाचे महत्त्व समजण्याची संधी मिळाली. शाळेच्या समन्वयक ममता बसवंती व प्राचार्य मानसी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गणित शिक्षिकांनी हा उपक्रम राबविला.






















