अकलूज – दिनांक 19 राजकीय पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही आदर्श आचासंहितेचे पालन करणे पोलिसांना अपेक्षीत असल्याचे उपअधीक्षक संतोष वाळके यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भयमुक्त व भ्रष्टाचार विरहीत होण्याच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सज्ज आहे.मात्र मतदारांनी त्यांना या संदर्भात आलेल्या कोणत्याही अडचणी बाबत तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन येथील पोलीस उप अधीक्षक संतोष वाळके यांनी केले आहे.
राजकीय पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनीही आदर्श आचासंहितेचे पालन करणे पोलिसांना अपेक्षीत आहे.त्यांनी मतदारांना प्रलोभने,आमिषे दाखवू नयेत,समाजात मतदारांत त्यांनी दहशत निर्माण करू नये.यासाठी मागील रेकॉर्ड वरून जवळपास ३५० गुन्हेगारांवर कारवाया केल्या आहेत. तडीपारीचे आणखी २५ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.शिवाय शांततेचा भंग करणार नसल्याचे अनेकांकडून बंधपत्र घेतले आहेत.
फिरत्या पथकासारखी विविध पथके तयार केली आहेत.माळशिरस तालुक्यातील इतर पोलीस ठण्यांबरोबरच आणखी जादा पोलीस कुमक मागवण्यात आली आहे.शहरातील १०५ पैकी शस्त्र जमा करून घेतली आहेत.शहरातील १४ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.त्यामुळे अशा परिस्थितीत या निवडणुका निर्विघ्न पार पाडण्याच्या दृष्टीने नागरिकांनीही सतर्क रहात अवैध शस्त्र वा अवैध पैशांचा वापर अगर अन्य कोणत्याही अडचणी दिसल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करावा,पोलीस त्यांचे नाव गुप्त ठेवतील असे आवाहन त्यांनी केले.यावेळी अकलूज पोलीस निरीक्षक नीरज उबाळे हे ही उपस्थित होते.




















