Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉक्टर व्हायचं होतं पण झालो वकील – पद्मश्री अ‍ॅड. उज्वल निकम

तरुण भारतbyतरुण भारत
November 20, 2025
in solapur
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर – आईची इच्छा होती मी डॉक्टर व्हावे म्हणून प्रयत्न केला परंतु अवघ्या 2 मार्काने माझी डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्ण राहिली पण वडीलांच्या इच्छेने मी वकील झालो. असे सांगून विशेष सरकारी वकील पद्मश्री खासदार उज्वल निकम यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने बुधवारी शिवछत्रपती रंगभवन मध्ये आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये ते बोलत होते. प्रिसिजन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. घरात वडील बॅरिस्टर होते म्हणून वडीलांची इच्छा होती की मी वकील व्हावे पण माझी इच्छा नव्हती. सहकाराच्या एका खटल्याने वकीलीची सुरूवात झाली. जळगांव येथील खटल्यातून मला मुंबई बॉम्बस्फोटात विशेष सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जळगांव ते मुंबई असा प्रवास करत असताना अनेक संवेदनशील आणि महत्वाच्या खटल्यात सरकारची बाजू मांडून गुन्हेगारांना शिक्षे पर्यत पोहोचवण्यात यश आले. त्यातच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात महत्वाची भूमिका आंतरराष्ट्रीयस्तरावर मांडता आली. माझी भावना नेहमी माझा देश प्रथम अशीच आहे म्हणूनच दहशतवादी कसाबला फाशी पर्यत आणि पाकीस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडण्यापर्यत यश मिळाले.


संजय दत्त आणि 93 चा बॉम्बस्फोट या प्रश्‍नावर ते म्हणाले संजय दत्त याने जर आधीच सुरक्षा यंत्रणांना सांगितले असते तर बॉम्बस्फोट झाले नसते. नेता असो की अभिनेता खोटी गांधीगीरी पांघरून पाप धुता येत नाही. आंतकवादाला कोणताच धर्म नसतो असेही ते म्हणाले. कसाब आणि बिर्याणी हे केवळ एक वकीली युक्तीवाद होता. मिडिया ट्रायलचा न्यायाधीशावर परिणाम होत नाही असे माझे मत आहे.


तरूण वकीलांनी कायद्याचा अभ्यास चांगला करावा, नेहमी सत्य सांगावे, कायद्याचे संरक्षण करावे असा सल्लाही त्यांनी एका प्रश्‍नावर दिला. निरपेक्ष आणि निधर्मी भावनेतूनच खरा न्याय मिळतो.


निवडणुकीला उभा राहणे ही चूक का या प्रश्‍नावर ते म्हणाले. अवघ्या 10 दिवसापुर्वी निवडणुकीला उभे राहण्यासाठी सांगण्यात आले त्यामुळे तयारी नव्हती तरीही निवडणूक लढवली जर माझा मतदारसंघ तुरूंग असता तर मी इतर कोणालाही पराभूत केलो असतो असे ते गंमतीने म्हणाले. मी स्वतःला डॉन समजतो मी बलवान आहे. अनेक गुन्हेगार मला घाबरतात असेही ते म्हणाले.


कुटुंबाला वेळ देता का या प्रश्‍नावर ते म्हणाले माझा देशच माझे कुटुंब आहे. जळगांव पासून सुरू झालेला जीवनाचा प्रवास मुंबई आणि आता राज्यसभेचा खासदार असा यशस्वीपणे सुरू आहे यामध्ये मी समाधानी आहे असेही ते म्हणाले

तब्बल दीड तास सुरू असलेल्या प्रकट मुलाखतीमध्ये माधव देशपांडे यांनी अनेक महत्वाचे प्रश्‍न विचारत निकम यांना बोलते केले. पद्मश्री अ‍ॅड उज्वल निकम यांनीही दिलखुलासपणे प्रत्येक प्रश्‍नाला उत्तरे दिली.


प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले आणि आभार व्यक्त केले तर उज्वल निकम आणि माधव देशपांडे यांचा परिचय अविनाश महागांवकर यांनी केला. नंतर अ‍ॅड उज्वल निकम यांच्यावरील चित्रफित दाखवण्यात आली. नंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता दिनेश परदेशी यांच्या हस्ते अ‍ॅड उज्वल निकम यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर माधव देशपांडे यांचा सत्कार इंद्रजीत पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मसापचे अध्यक्ष प्रा.दीपक देशपांडे, कार्याध्यक्ष प्रशांत बडवे उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष अमोल धाबळे,कार्यकारणी सदस्य प्रकाश मोकाशे, पृथा हलसगीकर, मेधा कुलकर्णी, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर यांच्यासह जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, योग शिक्षिका सुधा अळ्ळीमोरे, सिध्देश्‍वर किणगी,विशाल शिंदे, निलेश शहा, सात्विक बडवे, रसिका बडवे आदींसह मोठ्यासंख्येने श्रोते उपस्थित होते.

Post Views: 108
Previous Post

महापालिका आयुक्तांनी कॅम्प शाळेतील वर्गात जाऊन साधला विद्यार्थ्यांशी थेट संवाद

Next Post

आदर्श आचासंहितेचे पालन करणे अपेक्षीत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आदर्श आचासंहितेचे पालन करणे अपेक्षीत

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1000240

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!