तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : दरेगाववाडी येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत
येलो मोझॅक या विषाणूचा प्रादुर्भाव सर्व शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांवर झाला आहे यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पिवळे पडणे, सोयाबीनचे पाने डागे होणे अशी लक्षणे दिसुन येत आहे.
शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून सुद्धा सोयाबीन पिकांचा रोग काही जात नाही येलो मोजॅक विषाणूमुळे दरेगाववाडी गावामधील सर्व शेतकरी चिंतेमध्ये दिसून येत आहेत. गावातील काही शेतकऱ्यांनी कृषी तालुका अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येलो मोजॅक विषाणूमुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली असता
उपकृषी अधिकारी उप्पलवाड व सकृअ सोनकांबळे मॅडम यांनी दरेगाववाडी या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली व नुक्सानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय रक्कम मिळून देण्याची मागणी करणार असे त्यांनी दरेगाव वाडीतील शेतकऱ्यांना सांगितले.
तसेच सोयाबीन वरिल पिवळा मोझॅक व्यवस्थापना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पिवळा मोझॅक हा विषाण जन्य असून तो पांढरी माशीद्वारे उदभवतो अशी माहिती दिली व पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी एकरी १० पिवळा चिकट सापळा व थायमिथोक्साम १२.६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६% झेडसी ५० पिली किंवा असिटामिप्रीड २५% + बाइ फेन्थ्रीन २५% wg 1oogm किंवा बीटा साइफलुथ्रीन ८.४९% + इमिडाक्लोप्रीड ११९.८१% ओडी hom l यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर समस्याणात करावी असे मार्गदर्शन केले.