▶ वन्यप्राण्यांच्या हौदोसाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी …
मुखेड प्रतिनिधी :- रणजित जामखेडकर
मुखेड तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या जवळपास पुर्ण झाले आहेत. मागील ३ वर्षांपासून तालुक्यांमध्ये अतिवृष्टी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती यामुळे शेतकऱ्यांची निराशाच झाली आहे. परंतु यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पिक जोमाने येताना दिसत आहेत. या उभ्या पिकाला शेकडोंच्या टोळीने असलेले हजारो डुकरे उभ्या पिकात धुडगूस घालुन पिकांची प्रचंड नुकसान करीत आहेत तर
हरिण, रोही, वानरांनी जोमाने उगवणारी
सोयाबीन, मुग, उडीद, ज्वारी ,कापूस, तुर या प्रमुख पिकांची कवळी रोपटं खाऊन टाकत आहेत.
तालुक्यातील बेटमोगरा चांडोळा, चोंडी, मोटरगा,जामखेड, एकलारा, हिब्बट , हंगरगा,
जाहुर बाऱ्हाळी येवती आंबुलगा मुक्रामाबाद जांब या परिसरातील गावांतील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हौदोसाने शेतकऱ्यांना आपले पिक दिवस रात्र अंधारात जागुन पिकांचे राखन करावी लागते आहे.
दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी प्रशासनाने नेमलेले अधिकारी, कर्मचारी, वनरक्षकानी आपल्या वन्यप्राण्यांकडे दुर्लक्ष करून मोकाटच सोडुन देत आपल्या कर्तव्यात कसूर करतांना पाहावयास मिळत आहे.
वनविभागाच्या रामभरोसे कारभारामुळे बळीराजाच्या उभ्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे तालुका प्रशासनासह वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेत सहानुभूतीपूर्वक विचार करून तत्परतेने कारवाई करत वन्यप्राण्यांच्या हौदोस थांबवावा व वन्यप्राण्यांच्या बंदोबस्त करावा मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांतुन जोरदार धरू लागली आहे.