शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी” योजनेंतर्गत क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. या अभियानांतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आलेले आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत १७० शेतकरी लाभार्थ्यास विविध यंत्र अवजारे उदा. ट्रेक्टर, पॉवर टिलर, पॉवर रिपर इ. बाबींचा लाभ देण्यात आलेला आहे. या बाबींवर रक्कम रु. १५२.६५ लक्ष खर्च करण्यात आलेला आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण १ हजार ७५३ शेतकऱ्यांनी १३१९.१३ हे. क्षेत्रावर लागवड केलेली आहे, यामध्ये ११६८.३८ हे. क्षेत्रावर (१ हजार ४७२ शेतकरी) आंबा फळबाग लागवड १३.९५ हे. क्षेत्रावर (७३ शेतकरी) मोगरा लागवड व २८.३२ हे क्षेत्रावर (६१ शेतकरी) सोनचाफा लागवड केलेली आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत १०२ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यात आली. या योजनेंतर्गत रक्कम रु. ४३.२० लक्ष खर्च करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ३९ शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ देण्यात आलेला आहे. या घटकांतर्गत रक्कम रु. १८.८५ लक्ष खर्च झालेला आहे.
RKVY व NFSM योजनेतंर्गत भात, नाचणी व वरी पिकांचे ४ हजार ६०० शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आली. ५ हजार ३८६ शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य मिनीकोट वाटप करण्यात आलेले आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १३ पॅक हाऊस उभारण्यात आले असून याकरिता रक्कम रु. २५.२२ लक्ष खर्च करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत ७1 हजार ३७७ लाभार्थ्यांना रक्कम रु. ४२८२.०० लक्ष वाटप करण्यात आलेले आहे.
गोपीनाथ मुंढे अपघात योजनेंतर्गत १६ वारसदारांना रक्कम रु.३1.०० लक्ष वाटप करण्यात आलेले आहे.
फळपिक विमा योजनेंतर्गत ४ हजार ६११ लाभार्थ्यांना रक्कम रु.२३४३.२० लक्ष विमा संरक्षित रक्कम वाटप करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक दिपक कुटे यांनी दिली आहे.