मंठा/ जालना : सोयाबीन, कापूस हमीभावाने विक्री केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल या उद्देशातून हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस शासकीय खरेदी केंद्रात विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हाप्रमुख ए.जे.पाटील बोराडे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समिती मंठा यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत तळणी रोडवरील पार्थ ऍग्रो इंडस्ट्रीज येथे सोमवार (ता.1) रोजी शासकीय हमीभाव खरेदी केंद्राचे उद्घाटन सभापती श्री बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संचालक प्रल्हादराव बोराडे,अण्णासाहेब खंदारे,दत्ताराव बनसोडे,केशव महाराज सरकटे, किसनराव मोरे, बबनराव गणगे, वसंतराव राऊत,योगेश अवचार, तुळशीराम कोहिरे, केंद्रप्रमुख गजानन मुसळे, बाजार समितीचे सचिव रमेश बोराडे, पप्पू दायमा यांची उपस्थिती होती.
चालू हंगामात खरेदी केल्या जाणाऱ्या सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये प्रति क्विंटल असणार आहे. खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात.शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस आणताना स्वच्छ-कोरडे आणावे तसेच, ई-केवायसी पूर्ण करावी, खरेदी केंद्रावर शेतीमाल घेऊन येताना सोबत आधारकार्ड, 7/12 उतारा व बँक पासबुक घेऊन यावे. बाजार समितीकडून मिळालेल्या एसएमएस किंवा टोकननंतरच माल घेऊन यावा त्यामुळे वेळेत शेतीमाल खरेदी प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल असे सांगितले.
यावेळी सभापती ए जे बोराडे यांच्यासह संचालक व पार्थ ऍग्रोच्या वतीने वतीने सोयाबीन विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी रामा नारायण चव्हाण, संतोष माणिकराव टकले, शिवकुमार विजयकुमार देशमुख, विजयकुमार शामराव देशमुख, संजय उद्धवराव रंगे,श्रीमती लता संजय रेंगे यांचा शाल, हार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी पार्थ ऍग्रोचे संचालक संतोष साबू, नंदकिशोर साबू, सचिन साबू, व्यापारी शेख मुसाभाई,प्रकाश महाराज चिंचने, गणेश सराफ, संतोष डांगे,दत्तराव हातकडके,बाळकृष्ण जोशी, अशोक काकडे, पांडुरंग वैद्य, बाजार समितीचे सर्व कर्मचारी व परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

























