माळशिरस – पुरंदावडे तालुका माळशिरस येथील राहत्या घराशेजारी अतिक्रमण करून रस्ता अडवणूक केलेली असल्याने 50 वर्षीय आजी सोबत एक वर्षाच्या नातवासह मुले सुना समवेत माळशिरस पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे..
पुरंदावडे ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील शेजारील साधू पालवे यांनी राहत्या घराच्या पुढील बाजूस येणे जाण्याच्या रस्त्यावर जनावरे बांधत आहेत जाणे येण्याची अडवणूक केली जात आहे याबाबत पुरंदावडे ग्रामपंचायत येथे तक्रार केली असता प्रशासन कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाहीत.
आम्हाला न्याय कोणत्याही प्रकारचा मिळत नाही उलट साधू पालवे हे आमच्यावर खोट्या केसेस दाखल करतात त्यांना माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच देविदास ढोपे हे साधू पालवे यांना पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करून आमच्यावर अन्याय करीत आहेत तरी आम्हाला आमच्या राहत्या घराकडे जाणारा रस्ता अतिक्रमण काढून शासकीय नियमाप्रमाणे मोजमाप करून खुला करावा यासाठी छाया पालवे शंकर पालवे गणेश पालवे सुप्रिया शंकर पालवे अनिता गणेश पालवे यांच्यासह लहान मुले व मुली आमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या समवेत विघ्नेश पालवे एक वर्षाचा लहान मुलगाही उपोषण स्थळी आहे.
रस्त्यावरील अतिक्रमण काढलेले आहे घराच्या बाजूला शेड मारलेले लवकरच ग्रामपंचायत मासिक मीटिंगमध्ये घेऊन सदरचे बेकायदेशीर शेड सुद्धा काढले जाईल
रघुनाथ पांढरे , गटविकास अधिकारी माळशिरस..


























