भोकर / नांदेड – तालूक्यातील मौजे सोनारी येथील शेतकरी रामेश्वर ईबीतवार यांच्या शेती व घराकडे जाणा-या सार्वजनीक रस्त्यावर बांधकाम करून अडथळा निर्माण केला. याबाबत गावातील तंटामुक्ती समितीने बैठक घेतली आणि प्रशासनाकडे सूध्दा तक्रार दिली पण काही तोडगा काढला नसल्याने रस्त्यासाठी रामेश्वर ईबितवार यांनी दि.२३ पासून पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सूरु केले आहे.
गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गावातील जि.प. शाळे लगत मागील २० ते २५ वर्षांपासून पारंपरिक वहिवाट आहे. तीथे प्रकाश वारले, गणेश शिंदे यांच्या घरापासून माझ्या घरापर्यंत येणारा रस्ता प्रकाश वारले व बालाजी सूर्यवंशी मागील आठवड्यात १२ डिसेंबर रोजी ओठ्याचे बांधकाम करून रस्ता अडविला.त्यामूळे ईबितवार यांना घराकडे जाण्यासाठी अन्य कोणताही पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने सदरील जागेची चौकशी करुन रस्ता खूला करुन देण्यात यावा.
या मागणीसाठी रामेश्वर ईबितवार यांनी भोकर पंचायत समितीच्या समोर दि.२३ पासून बेमुदत आमरण उपोषण सूरु केले असून जो प्रर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यानी घेतली आहे.

























