वळसंग : येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेतील महिला कर्मचारी भगिनींचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य वीरेश थळंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक शिवानंद घोडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार, संजयकुमार धनशेट्टी, सिद्धाराम भैरामडगी, बाळकृष्ण गुंड, निलकंठ कवटगी,प्रा.संतोष शिंदे हे उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेतील सहशिक्षिका विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी, स्नेहा हळगोदे व वरिष्ठ लिपिका राजश्री दुधगी तसेच शालेय पोषण आहार बनविणारे मनिषा मणुरे, अनिता धनशेट्टी,काळम्मा थळंगे व सुनिता कुर्ले या सर्वांचे प्रशालेतर्फे कुंकवाचा करंडा व गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आले.
तदनंतर प्राचार्य वीरेश थळंगे यांनी आपल्या मनोगतातून अनेक कर्तृत्ववान स्त्रियांची उदाहरणे देत जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले व प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींना आणि महिला भगिनींना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन मुलींनी प्रत्येक गोष्टीत हिरहिरीने सहभाग नोंदवून आपले वर्चस्व गाजवावे असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बसवराज दुधगी,वीरेश थळंगे, सिध्दारुढ हिरेमठ,गंगाधर बिराजदार, संतोष कस्तुरे,विजय प्याटी, मल्लिनाथ गौडगाव,अजय माणकोजी, शिवराज अष्टगी,प्रा.शरणय्या मसुती , लिपिक गौरीशंकर चनशेट्टी, सेवक कट्टेप्पा कोळी व विनोद दुधगी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग उपप्रमुख श्रीमंत भोसले यांनी केले.
























