अक्कलकोट – सध्या देशभरात बोगस मतदारांवरून गदारोळ सुरू असताना अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बु गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याची धक्कदायक माहिती उघकीस आली आहे. याबाबत सर्व दोषीवर तात्काळ फौंजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा तहसीलदार कार्यालय येथे येत्या पाच दिवसात आमरण उपोषण करणार असल्यांची इशारा मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष, प्रविण घाटगे यांनी दिली आहे.
अक्कलकोट मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष प्रविण घाटगे व बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते, यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी देशमुख व तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिले आहे. सांगवी बु मध्ये गेल्या सहा महिन्यापासून गावातील काही मुलाच्या मोबाईल वरून मतदार नोंदणी चे ६ नं फॉर्म भरण्यात आले होते. त्या फॉर्म भरतेवेळी गावातील रहिवाशी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड व फोटो मागवून त्यांचे फॉर्म मोबाईल वरून भरण्यात आले पण विशेष धक्कादायक बाब अशी कि, या सर्वांच्या आधारकार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची आणि मागील बाजूच्या आधारकार्डवर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले.
सांगवी बु गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचा आरोप अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघांचे अध्यक्ष प्रविण घाटगे यांनी केला आहे.असे तब्बल १६० हुन अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या मध्यमातून बी एल ओ अशोककुमार सुतार यादी भाग क्र १५२ यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करून ही बोगस मतदार नोंदणी करण्यात आली आहे. त्या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधारकार्ड व काहींचे वय देखील पूर्ण नसताना त्यांचे आधारकार्ड एडिट करून वय व पत्ता बदलेले असल्याचे पुरावे देखील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना लेखी तक्रारी अर्जसोबत जोडले असून, मुंबई भांडुप मतदार संघात देखील या बोगस मतदारांचे नावे असून, त्यांची यादी देखील पुरावा म्हणून जोडले आहे. मुंबई, पुणे व इतर गावामधील मतदार यादीत नाव असताना सांगवी बु मधील यादीत पत्ता एडिट करून सांगवी बु यादीत बोगस नावे कशी काय घालण्यात आली, याची कसून चौकशी व्हावी अशी मागणी मराठा सेवा संघांचे अध्यक्ष प्रविण घाटगे व बबन गायकवाड, प्रदीप सलबत्ते, यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.



















