वेळापूर – अकलूज रस्ता दुरुस्त करावा, खड्डे बुजवावेत या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माळशिरस तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग,अकलूज येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदन दिले होते.
या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर अकलूज–वेळापूर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
तसेच वेळापूर–निमगाव, वेळापूर–म्हेत्रेमळा, तसेच अकलूज येथील अशोका चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, असे कार्यकारी अभियंता सौ. सुनीता पाटील यांनी सांगितले आहे.
रिपब्लिकन पक्षाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जनतेचा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून, या कार्यासाठी मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे.
यावेळी युवक आघाडी राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे, तालुका सरचिटणीस मारुती खांडेकर, युवक आघाडी तालुका अध्यक्ष दशरथ नवगिरे,अकलूज शहराध्यक्ष अजित मोरे,युवक तालुका सरचिटणीस प्रवीण साळवे,तालुका उपाध्यक्ष संतोष कांबळे,भास्कर बनसोडे,प्रकाश गायकवाड,आदी उपस्थित होते.
——————————————
“वेळापूर–म्हेत्रेमळा या मंजूर कामासह सर्व रस्त्यांची कामे तात्काळ पूर्ण व्हावीत आणि अकलूजच्या विकासासाठी रिपब्लिकन पक्ष सदैव प्रयत्नशील राहील,”
— मिलिंद सरतापे, तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)
——————————————
खड्डे बुजवताना कामाची पाहणी करताना मिलिंद सरतापे सतीश नवले मिलिंद गायकवाड दिसत आहेत.