वेळापूर – अकलूज – वेळापूर रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, वाहनधारक, विद्यार्थी यांना मोठ्या प्रसंगांचा सामना करत खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढावा लागतोय, परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळशिरस तालुका यांच्यावतीने तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांच्या नेतृत्वाखाली वेळापूर येथे प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ यांना घेऊन भव्य स्वरूपात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
रस्त्याच्या कामाला त्वरित सुरुवात करावी अन्यथा बांधकाम विभागाला टाळे ठोकून हलगी नाद आंदोलन करणार असा इशाराही देण्यात आला होता.
सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता सौ.सुनीता पाटील यांच्या वतीने लेखी पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले होते. अखेर आंदोलनाचा धसका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने जवळपास ४८.३७ लाख रुपये निधी मंजूर करून प्रत्यक्ष खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सदरचे खड्डे दर्जेदार बुजवण्यात यावेत यासाठी तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांनी भेट देऊन संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या.
हा रास्ता अतिशय जीर्ण झालेला आहे. प्रत्येक वेळी डागडुगी केली जाते या रस्त्याची खुदाई करून नव्याने रस्त्याची बांधणी करण्यात यावी किंवा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गकडे वर्ग करणे गरजेचे आहे.
—————————————
इंदापूर-जत हा राष्ट्रीय महामार्ग आहे परंतु वेळापूर अकलूज हा ११ कि.मी.
रस्ता वगळण्या आला आहे.
वेळापूर-अकलूज हा ११ कि.मी. रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्यात यावा यासाठी रिपाइं च्या वतीने खासदार धैर्यशील मोहिते पाटील,आमदार उत्तमराव जानकर यांच्या मध्यमातून लढा सरू राहणार आहे.
—:
मिलिंद सरतापे तालुकाध्यक्ष
रि.पा.इं.आठवले.


























