सुस्ते – महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे यांच्या वतीने शिक्षक, अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक उमेश उघडे यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती-सादरीकरण स्पर्धेत भाग घेऊन तालुक्यामधून प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी मारुती लिगाडे, केंद्र प्रमुख सुभाष आधटराव,मुख्याध्यापक विकास कांबळे, सहशिक्षिका सरिता कापसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी अभिनंदन व कौतुक केले.

























