माढा : आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उपळाई बु पंचायत समिती गणातून राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष गोरख वाकडे हे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी भाजपचे नेते तथा जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे.
गोरख वाकडे हे गेली 12 वर्ष राजकारणात सक्रिय असून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षातून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली आहे.त्यांनी रासपचे माढा तालुका अध्यक्ष,जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख पदावर काम केले आहे.विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी माढा तालुक्यात विशेषतः उपळाई बु जिल्हा परिषद गटामधील मतदारांशी सलोख्याचे व हितसंबंध नाते निर्माण केले आहे.उपळाई बु जिल्हा परिषद गटामधील तळागाळातील लोकांपर्यंत त्यांचा दांडगा संपर्क आहे .ते धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करत असून उपळाई पंचायत समिती गण हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे .या गणामध्ये धनगर समाजाचे मतदान अधिक असल्याने त्यांच्या उमेदवारीचा फायदा केवळ पंचायत समिती गणा पुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्हा परिषद गटाला होणार असल्याने ते या गणाचे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत.
उमेदवारीची मागणी करताना सोबत संदीप पाटील, शाहू वाकडे, नागनाथ गुंड, ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ बेडगे, बिरा वाकडे, विकास बेडगे, राहुल बाबर, किरण शेंडे,तुषार जाधव, विश्वनाथ शिंदे, विनोद गाडेकर, विजय भांगे, बाळू वाकडे, गणेश वाकडे, आदी मित्रमंडळी सोबत होते.

















