Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरणासाठी कोणाचेही राहते घर बाधित होऊ नये – ना.धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांची रेल्वेमंत्र्यांकडे थेट भेटून मागणी*

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2024
in top news
0
परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरणासाठी कोणाचेही राहते घर बाधित होऊ नये – ना.धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांची रेल्वेमंत्र्यांकडे थेट भेटून मागणी*
0
SHARES
60
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

*परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरणासाठी कोणाचेही राहते घर बाधित होऊ नये – ना.धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांची रेल्वेमंत्र्यांकडे थेट भेटून मागणी*

*कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे यांच्यासह शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन केली चर्चा*

*परळी-नगर कामाला गती देणे, परळी ते मुंबई स्वतंत्र रेल्वे, एक्सप्रेस गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा देणे यांसह जिल्ह्यातील रेल्वे मागण्यांच्या संदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा*

*विकासकार्य व जनतेचे हित लक्षात घेत निर्णय घेण्यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेईन निर्णय घेऊ – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला शब्द*

मुंबई (दि. 19) – परळी वैद्यनाथ ते परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण करण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, मात्र यासाठी भूसंपादन करताना कुणाचेही राहते घर बाधित होऊ नये. त्यासाठी भूसंपादन करताना दक्षिण ऐवजी मूळ रुळाच्या उत्तर बाजूने भूसंपादन केले जावे तसेच भूसंपदान करण्यासाठी 19 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले राजपत्र स्थगित करावे, अशी मागणी आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना समस्त परळीकरांच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे व आ.पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.

परळी-परभणी रेल्वे रूळ दुहेरीकरण संदर्भात सुमारे 350 आक्षेप अर्ज दाखल झाले असून त्याबाबत निर्णय, परळी-बीड-नगर रेल्वे कामाला गती देणे यांसह बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक विविध मागण्यांच्या संदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे व शिष्टमंडळाने गुरुवारी सायंकाळी मुंबई येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन निवेदन सादर करत सविस्तर व सकारात्मक चर्चा केली. मंत्री श्री.अश्विनी वैष्णव यांनीही सर्व मागण्या समजून घेत त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.

परळी-बीड-अहिल्यानगर (अहमदनगर) रेल्वे कामाला परळीच्या बाजूने देखील सुरुवात करण्यात यावी, परळी ते मुंबई स्वतंत्र एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, लातूर एक्सप्रेस परळी पर्यंत वाढवण्यात यावी, नांदेड-पनवेल एक्सप्रेस प्रवाशांच्या व भाविकांच्या सोयीसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत वाढवण्यात यावी. घाटनांदूर मार्गाने जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना घाटनांदूर येथे थांबा देण्यात यावा, घाटनांदूर परिसरातील राजा भैय्या पांडे यांच्या शेतातून जाणाऱ्या रेल्वे रुळासाठी अंडरपास द्यावा, चोपणवाडी उड्डाणपूल, परळी शहर बायपास, उड्डाणपूल, पादचारी मार्ग आदी ठिकाणी अंडरपास उभे करण्यात यावेत, यांसह बीड जिल्ह्यातील महत्वाच्या रेल्वे विषयक मागण्यांबाबत निवेदनासह सविस्तर चर्चा करण्यात आली.

विकासाचे कार्य अविरत सुरू ठेवत जनतेच्या हितार्थ निर्णय घेणारे आपले सरकार असून, परळी वैद्यनाथ सह बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक मागण्यांच्या संदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा शब्द यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी शिष्टमंडळाला दिला.

यावेळी शिष्टमंडळात ना.धनंजय मुंडे, आ.पंकजाताई मुंडे, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, अय्युब खान पठाण, अजीज कच्छी, इस्माईल पटेल, शंकर आडेपवार, विजय भोयटे, केशव गायकवाड, अनंत इंगळे, दीपक तांदळे, अय्युब बागवान, गफार बागवान, इलियास बागवान, जावेद कुरेशी, रवी मुळे, शकील कच्छी, जाफर बागवान, अजीज पटेल, राजू शेख, महेंद्र रोडे, रेल्वे संघर्ष समितीचे जी.एस.सौंदळे गुरुजी यांसह आदी उपस्थित होते. कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना परळी स्थित पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभुंच्या दर्शनाचे निमंत्रणही दिले आहे.

*रेल्वेमंत्र्यांनी दिला सविस्तर वेळ*

रेल्वेमंत्री मुंबईत येणार हे समजताच परळीकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या या प्रश्नाच्या संदर्भात धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे त्यांची वेळ घेतली. रेल्वेमंत्री हे पक्षाच्या एका बैठकीला आलेले असल्याने प्रचंड व्यस्त असतानाही धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी बैठकीतून व्यस्त वेळ काढून पक्षाच्या कार्यालयातच शिष्टमंडळासोबत चर्चा केली. यावेळी प्रस्तावित रेल्वे मार्ग, त्याचा नकाशा याची स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली. धनंजय मुंडेंनी सादरीकरण करून परिस्थितीची जाणीव करून दिली.

Post Views: 34
Previous Post

गोळ्या झाडून तरुणाचा खून* *उद्योग नगरीत खळबळ*

Next Post

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बिघडले…बँकांचे काम थांबले, विमानांचे उड्डाण रद्द, शेअर मार्केट बंद… बिघाड दूर करण्यासाठी वापरा या स्टेप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बिघडले…बँकांचे काम थांबले, विमानांचे उड्डाण रद्द, शेअर मार्केट बंद… बिघाड दूर करण्यासाठी वापरा या स्टेप

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बिघडले…बँकांचे काम थांबले, विमानांचे उड्डाण रद्द, शेअर मार्केट बंद… बिघाड दूर करण्यासाठी वापरा या स्टेप

ताज्या बातम्या

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

सोलापूरकरांनो मुंबईसाठी धावणार विशेष रेल्वे #solapurnews #viral #news

May 29, 2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली पहिल्याच दिवशी धडक कारवाई #viral #news #marathinews

May 29, 2026

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून #viral #solapurnews

May 29, 2026

ईदसाठी आलेल्या हनीफ सोबत घडले विचित्र जागीच झाला मृत्यू

May 29, 2026

जरांगे पाटील करणार पुन्हा आंदोलन #viral #marathinews#news

May 29, 2026

पोलिसांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत येऊन उभी राहिली पोलीस स्टेशनात

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886002

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697