श्रीपूर – नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यात वेळापूर जिल्हा परिषद गटात मिनाक्षी मिलिंद सरतापे, जांबूड जिल्हा परिषद गट नागेश भोसले, तर पंचायत समिती जांबूड गणातून अप्पासाहेब पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निवडून आले.
या विजयी नूतन सदस्यांचा सत्कार श्रीपूर येथे डॉ . सुहास बनसोडे यांचे परिवाराचे वतीने श्री सेवा रुग्णालय मध्ये करण्यात आला.
या प्रसंगी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार आरपीआयचे युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्य कार्यकारिणी प्रवक्ते सदस्य नरेंद्र भोसले तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले आरपीआय चे जिल्हा सचिव भारत आठवले आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष दशरथ नवगिरे आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब पोळके आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष संजय भोसले आरपीआयचे शहर अध्यक्ष गणेश सावंत नगराध्यक्षा पती अशोक चव्हाण आरपीआयचे शहर उपाध्यक्ष संजय खरे आरपीआयचे खजिनदार रमेश भोसले महामानव प्रतिष्ठान चे पदाधिकारी प्रथमेश लोंढे विश्वजीत भालशंकर अजित भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संदीप सुरेश घाडगे नितीन घाडगे शहाजी चंदनशिवे भारत काळे इत्यादी उपस्थित होते यावेळी भारत आठवले नरेंद्र भोसले यांनी विचार मांडले आभार शामराव भोसले यांनी व्यक्त केले .

























