नागपूर, 20
नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आपल्या कुटुंबासह
नागपुरातील महाल परिसरातल्या मतदान केंद्रात मतदान केले.विधानसभा
निवडणुकीच्या अनुषंगाने आज, बुधवारी मतदान झाले. यावेळी मध्य-नागपूर मतदारसंघात
गडकरींनी मतदान केले. याठिकाणी भाजपचे प्रवीण दटके, कांग्रेसचे बंटी शेळके
यांच्यात प्रमुख लढत आहे. महाल परिसरातील टाऊन हॉल मतदान केंद्रात जाऊन गडकरींनी
मतदान केले. यावेळी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी, निखील, सारंग (मुले) आणि ऋतुजा, मधुरा
(सुना) या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर संवाद साधताना गडकरी म्हणाले
की,
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नाने महाराष्ट्रात मोठ्या
प्रमाणावर विकास कामे झालेली आहेत. सिंचन, कृषी, रस्ते, पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रात मोठ्या
प्रमाणावर विकास झाला आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता यंदा विकासाला मतदान
करणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.