मंगळवेढा – रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी वलखड तालुका खानापूर येथील अंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोग राष्ट्रीय अध्यक्ष डॉ संतोष बजाज सर यांच्या परवानगीने राष्ट्रीय मुख्य उपाध्यक्ष श्री अमरदीप आपगे साहेब, राष्ट्रीय संयोजक डॉ विश्वदीप आपगे साहेब
यांचे उपस्थितीत आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ संतोष डांगे यांचे अध्यक्षतेखाली मासिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते त्या कार्यशाळेत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर संतोष डांगे सर आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष अमरदीप आपगे यांचे हस्तेश्री.गंगाधर लक्ष्मण कोळी यांना पश्चिम महाराष्ट्र क्षेत्रीय प्रभारी नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
गंगाधर लक्ष्मण कोळी हे पीएमश्री कै.नानासाहेब नागणे प्रशाला न.पा. मुलांची शाळा नं.४ नागणेवाडी, मंगळवेढा येथे मुख्याध्यापक पदी कार्यरत आहेत. त्यांची मानवी हक्क क्षेत्रात असलेली सखोल आवड आणि सामाजिक सेवेतील सततचा सक्रिय सहभाग आणि नोकरीतील कर्तव्य, जबाबदारी यात कोणतेही कसूर न करता देशाप्रती असलेली खरी निष्ठा आणि त्याग लक्षात घेऊन वरील पदावर यांची नियुक्त करण्यात आली आहे. तसेच 2006 पासून विविध शिक्षक आणि सामाजिक संघटनेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वरील पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे मंगळवेढा शहराध्यक्ष, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष, गांधी फोरम महाराष्ट्र राज्याचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष, अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंचाचे सोलापूर जिल्हा संघटक, केंद्रीय मानवाधिकार संघटनेत राष्ट्रीय क्राईम रिपोर्टर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेउपाध्यक्ष आणि राष्ट्रीय संघटन सचिव हे सर्वात उच्च पद भुषविले आहे. माहिती अधिकार महासंघाचे जिल्हा संपर्कप्रमुख असे विविध संघटनेत काम करून त्यांनी वैयक्तिक ठसा उमटवला आहे.
तसेच समाजात महिला छळ ,पुरुष छळ, हुंडा छळ, खून, बलात्कार, बालशोषण, कामगार शोषण, मानवी तस्करी, मानवी अवयवांची तस्करी, उपासमार, फसवणूक, भ्रष्टाचार, भीती दहशतवाद, खोटे आरोप, पोलीस प्रशासनाकडून असहकार, मूलभूत हक्काचे उल्लंघन, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाच्या मूलभूत उद्दिष्टे या क्षेत्रात आणि बेकायदेशीर कृत्ये वरील सर्व समस्याविरुद्ध वेळोवेळी सरकारी अधिकारी व प्रशासन यांना सोबत घेऊन गंगाधर कोळी यांनी काम करण्यास सक्षम असणार आहेत. त्यांचा या निवडीबद्दल सामाजिक,शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहेत.























