मुदखेड ता प्र
मुदखेड नगरपरिषद्द अंतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाची थकीत रक्कम त्वरीत अदा करणे व तसचे प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावे
मुदखेड नगरपरिषद अंतर्गत शहरातील विविध भागातील नागरीकांना स्वतःचे पक्के घर मिळावे यासाठी शासनाकडून
एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम योजनेची सुरुवात करण्यात आली होती.
सदरील योजने अंतर्गत मुदखेड नगरपरिषदेने सहभाग नोदंवून शहरातील गोरगरीब नागरीकांना स्वतःची पक्की घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने योजनेची सुरुवात करण्यात आली होती तसेच सदरील योजना मुदतीत पुर्ण करणेसाठी शासनाकडून वेळोवेळी अनुदान सुध्दा वितरीत करण्यात आलेले आहे. सदरील योजना ही सन २०१०- ११ या वर्षापासून मुदखेड नगरपरिषद अंतर्गत चालू आहे, सदरील योजने अंतर्गत मुदखेड शहरातील मातंगवाडा (साठेनगर), वसंतनगर तांडा, न्याहाळी, चांभारवाडा, नवि आबादी व भिमनगर यासह इतर ठिकाणी योजने अंतर्गत
एकूण ८०१० घरकुल मंजूर करण्यात आलेले आहे,
आता केंद्र शासनाकडून प्रधामंत्री आवास योजना शहरात प्रगतीपथावर असून सदरील योजनेची प्रभावी अंमलबजावणी चालू असून सदरील योजनेतील बन्ऱ्याची नागरीकांची घरे पुर्ण झाली असून त्यांनाही अंतिम टप्यासाठी वारंवार नगरपरिषदेच्या चकरा माराव्या लागत असून यामध्ये नाहक नागरकांची वाताहत होत आहे.
त्यामुळे आपणास निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची थकीत असलेली घरकुलाची देयके तात्काळ अदा करून गोरगरीब नागरीकांची थकीत देयके तात्काळ अदा करण्यात यावीत व प्रधानमंत्री आवास योजनेची अवस्था एकात्मिक गृह निर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम या योजने सारखी होऊ नये या दृष्टीकोनातून घरकुलाचे अनुदान वाटप तात्काळ करण्यात यावेत. नगरपरिषद स्तरावरून कोणतीही कार्यवाही न झाल्यास लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा कॉंग्रेस कमिटी शहराध्यक्ष कैलास विश्वनाथ गोडसे यांनी दिला आहे. यावेळी युवक शहराध्यक्ष मुजीब पठाण, युवक उपशहराध्यक्ष अविनाश चौदंते,अमोल चौदंते, ऋषिकेश चौदंते, जनार्धन क्षिरसागर, राजरतन क्षिरसागर, इमरान भाई,मुकेश कांबळे, संदेश चौदंते, यांची उपस्थीती होती.