लोहा
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यी एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी मधील सहभागी होणाऱ्या दिंड्यांना वीस हजार रुपयांचे अनूदान देण्याची घोषणा म्हणजे तमाम वारकऱ्यांचा अपमान असल्याचे माजी आ.रोहिदास चव्हाण यांनी भावना व्यक्त केल्या.
दरवर्षी वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक दिग्गज,दानशूर मंडळी वारीतील भाविकांना खर्च करतात.कोणी अन्नदान ,रुग्णसेवा , फळ वाटप करतात याचा कोणीच ऊहापोह करत नाहीत पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विस हाजार रुपये जाहीर करुन सांप्रदायिक वृत्ती कमकुवत करत असल्याचे त्यांच्या आनुदानावरुन दिसुन येते.
तमाम वारकरी संप्रदाय नाराज आहे .नोंदणीकृत आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजाराच्या अनुदानाची घोषणा करणे म्हणजे संप्रदाय सोडून अनुदानाच्या मागे लागने होय अनुदान मिळते म्हणुन आषाढी वारीची दिंडी घेऊन जाणे होय महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्याचा अवमान होय असे म्हणाले यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक भिमराव पाटील शिंदे व युवानेते नवनाथ चव्हाण यांनी सुध्दा खंत व्यक्त केली.