वेळापूर – येथे आमदार उत्तमराव जानकर यांच्या गरुड बंगला निवासस्थानास महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी माळशिरस तालुक्यातील शिवसेना पक्षाचे पदाधिकारी तसेच निमगाव जिल्हा परिषद गट, निमगाव व गोरडवाडी पंचायत समिती गणातील नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचा आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य व माळशिरस पंचायत समिती सदस्य यांचाही कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम, प्रलंबित प्रश्न आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी माळशिरस शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, जि. प. सदस्य गौतमआबा माने-पाटील, माळशिरस पं. स. माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे, रिपाई आठवले माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे, बाबासाहेब माने-पाटील, पं. स. सदस्य दत्तात्रय मगर तसेच वेळापूर सरपंच रजनीश बनसोडे अमोल पनासे, महादेव तूपसौंदर, शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील साठे, वेळापूर शहर प्रमुख महेंद्र साठे, तालुका सोशल मीडिया प्रमुख अमोल साठे, सुनील ढोबळे, पैगंबर मुलाणी, बाबा ननवरे तसेच माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, आर.पी.आय. व इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























