सोलापूर – प्रखर राष्ट्रभक्त वक्ता श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी विकास सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली. बँकेचे चेअरमन श्री. कमलकिशोर राठी यांनी त्यांचे स्वागत केले. माजी चेअरमन सीए राजगोपाल मिणियार यांनी बँकेची माहिती दिली.
यावेळी बोलत असताना सनातन धर्माचे महत्त्व व त्यामधील प्रथांना असलेला शास्त्रीय आधार याविषयी त्यांनी उपस्थित सर्व संचालक व निमंत्रितांचे प्रबोधन केले. नवीन पिढीला आपण शास्त्रीय आधाराने सनातन धर्माचे महत्त्व समजावून सांगणे कसे आवश्यक आहे हे देखील त्यांनी विशद केले.
विकास बँक करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून गौरवोद्गार काढले व यापुढे देखील असेच उपक्रम घेण्यासंबंधी सूचना केल्या.
यावेळी उपाध्यक्ष राजगोपाल चंडक, हरीनिवास जाजू, मनीष बलदवा, सुरेश बिटला, अनुराधा चंडक, सुनील माहेश्वरी, प्रवीण बजाज, पांडुरंग मंत्री, अविनाश महागावकर, शहाजी पवार, प्रशांत बडवे उपस्थित होते.
























