Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सरकारने १७ लाख नोकऱ्या रद्द करुन तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले – ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे 

तरुण भारतbyतरुण भारत
April 11, 2026
in editor
0
सरकारने १७ लाख नोकऱ्या रद्द करुन तरुणांना बेकारीच्या खाईत लोटले – ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे 
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – देशात उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला नोकरी व काम नसल्यामुळे ते बेरोजगार झाले आहेत. २०१३ ते २०२३ पर्यंत केंद्र सरकारने १७ लाख नोकऱ्या रद्द करून सतरा लाख कुटुंबाला नोकरीपासून वंचित ठेवून बेकारीत लुटण्याचे काम केले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्याचा निर्णय २०२४ मध्ये दिला. त्यामुळे समाजामध्ये उसळण सुरू होऊन वाद होत आहेत. ते वाद व्हावलाच पाहिजेत यासाठीच तो निर्णय दिला आहे. तू निर्णय कोणत्या आधारे दिला निर्णय देऊन जातीजातीमध्ये संघर्ष करणे हा या पाठीमागचा उद्देश आहे. मात्र संविधानाच्या माध्यमातून जात विरहित काम करणे अपेक्षित असताना हा दिलेला निर्णय न्यायाशी संगत सुसंगत नाही. जर क्रिमिलेअरची अट नोकरीच्या आरक्षणाला असेल तर ती राजकीय आरक्षणाला देखील लावावी. दोन वेळा खासदार किंवा आमदार झाल्यानंतर त्याला पुन्हा निवडणुकीस बंदी घालावी. तसेच पक्षांतर केल्यास त्याचे सदस्यत्व रद्द करीत पक्षांतर बंदीचा कायदाच रद्द करण्यात यावा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांनी दि.९ एप्रिल रोजी केली.

धाराशिव शहरातील गोरे कॉम्प्लेक्स येथील नालंदा फॅशन डिझायनिंग महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या….फुले-आंबेडकरी चळवळीची कोंडी आणि ती फोडण्याचा मार्ग…. या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा रवी सुरवसे, सचिव नागनाथ गोरसे, मारोती पवार, प्रा.अंबादास कळासरे, अमोल गडबडे, व्ही.एस. गायकवाड, जगदीश जाकते, विकास काकडे, कांबळे, प्राचार्य डॉ रमेश दापके आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना कांबळे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा स्वीकार केला व तीच जीवन पद्धती असल्याचा विचार दिला.

१९५६ नंतर धार्मिक चळवळ त्यांनी नाकारली. कारण धर्माचे कार्य पृथ्वीची रचना कशी झाली ? हे आहे तर धम्माचे जगाची पुनर्रचना करणे हे प्रयोजन असल्याचे डॉ आंबेडकरांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनाच्या विचाराबरोबरच राजकीय अधिकाराला महत्त्व दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जातीयवादी व्यवस्थेने सत्ता व ज्ञान यापासून वंचित ठेवले तर आधुनिक काळामध्ये फुले आंबेडकरांनी बंड केल्याचे सांगत ते म्हणाले की, २०२० पासून शस्त्र व शास्त्र मिळवून देण्याची लढाई सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकरांचा सायमन कमिशन व गोलमेज परिषद हा राजकीय लढा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच देशात फक्त ४ राजकीय प्रवाह असून यामध्ये गांधीवादी, मार्क्सवादी विचार (कम्युनिस्ट), हिंदुत्ववादी व आंबेडकरी या विचारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ आंबेडकरांचे तत्व जातीभेद, वर्णविरहित समाज रचना करणे, देशात सामाजिक समता प्रस्थापित करणे व न्याय मूल्यावरती समाजाची रचना करणे हे आहे.

मात्र, संविधान सांगते त्याप्रमाणे आजपर्यंत सामाजिक, आर्थिक व राजकीय सत्तेमध्ये विषमता असून संविधानावर आधारित सामाजिक रचना झाली नाही. सामाजिक व्यवस्था सुधारली नसताना ती अधिक कशी बळकट होईल अशा प्रकारचे राजकीय निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे देशात सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक घडामोडींकडे बारकाईने डोळ्यात तेल घालून लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघात कोणत्या जातीचे प्रमाण आहे हे ठरवून उमेदवार देत असल्यामुळे उमेदवार केंद्रित ही निवडणूक पद्धत आहे. त्यामुळे सध्याची निवडणूक पद्धत विषमता अधिक बळकट व टिकून ठेवण्याचे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जातगणनेच्या माध्यमातून संपत्तीचे समान वाटप करणार आहेत का ? असा सवाल त्यांनी विचारला. 

फुले आंबेडकरी चळवळीची कोंडी फोडायची असेल तर राजकारण करताना पदोपदी डॉ आंबेडकरांना समजून घेतले तर निश्चितपणे कोंडी फुटणार असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी अरविंद गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्ती व त्यांच्या माता-पित्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक प्रा रवी सुरवसे यांनी तर सूत्रसंचालन बाबासाहेब मनोहर यांनी आणि उपस्थितांचे आभार मनिषा ताकपीरे यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, शामल ताकपीरे, त्रिशाला ठाणांबीर, जयश्री ताकपीरे, लीना सोनकांबळे, पंडित कांबळे, जयराज खुने, ज्ञानेश्वर ढावरे, रवी केसकर, अनिता कळासरे, दत्ता थोरे आदींसह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 9
Previous Post

महात्मा फुले व डॉ आंबेडकर जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर

Next Post

महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त पिसेवडी रक्तदान शिबिर; ११० बॉटल रक्तसंकलन

ताज्या बातम्या

खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

खासदार ज्योती वाघमारे व माजी मंत्री म्हेत्रे यांचा भव्य सत्कार 

April 11, 2026
मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

मुस्ती येथे ग्रामदैवत शेख उमर साहेब यात्रा महोत्सव 2026 : भव्य जंगी कुस्त्यांचें आयोजन

April 11, 2026
पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

पहाट उपक्रमाच्या अंतर्गत बोरवेल निर्मिती

April 11, 2026
चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

चायनीज गाडी व पावभाजी सेंटरवर धाडीत ९ घरगुती सिलेंडर जप्त

April 11, 2026
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

April 11, 2026
वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

वालचंदमध्ये ‘युथ वेलनेस रिट्रीट’ अध्यात्म, विज्ञान आणि आत्मजागरूकतेचा प्रेरणादायी संगम

April 11, 2026
रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

रिश्ते ही मायने रखते है ! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे : सुप्रिया सुळे

April 11, 2026
उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

उन्हाळ्यात जार पाण्याची वाढती मागणी; गुणवत्ता तपासणे का ठरतेय अत्यावश्यक?

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0801779

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697